SGYP Blog (Relaunched with English & Marathi Audio feature) : संत ज्ञानेश्वर

*|MC:SUBJECT|*
View this email in your browser
(Click above to open)
SGYP Blog (English Audio Narration) : संत ज्ञानेश्वर
(Click above to open)
SGYP ब्लॉग  (मराठी ऑडिओ कथन) - संत ज्ञानेश्वर
SGYP Blog (Marathi Audio Narration) - : संत ज्ञानेश्वर
Facebook
Website
Email
YouTube

संत ज्ञानेश्वर

- सौ जयश्री काजरेकर


पूर्व संकल्पाप्रमाण ९/१0 (कॅनडा/भारत) जुलै च्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने आपण संत संगतीचा सत्संग करणार आहोत. आषाढी एकादशी, उपवास आणि वारी ह्या तीन गोष्टी एकाच श्रद्धेने निगडित आहेत. ती म्हणजे पंढरपूरच्या विठोबाच्या दर्शनाची ओढ. ह्या एकादशी पासून कार्तिकी एकादशी पर्यंत भगवान विष्णू, क्षीरसागरात शेष शय्येवर झोपी जातात म्हणून ह्या एकादशीला ‘देव शयनी’ एकादशी हे नाव आहे.
 
एकादशी संबधी एक पौराणिक कथा आहे. ‘मृदूमान्य’ नावाच्या शिवभक्त दैत्याने भगवान शंकरांकडून अमर राहण्यासाठी एक वर मागून घेतला. आपला मृत्यू कोणा पुरुषा कडून होणार नाही हा वर मिळताच त्या दैत्याने सर्व देवांना पराभूत करण्याचे ठरवले. तेंव्हा ब्रह्मा, विष्णू आणि महेश एका गुहेत एकत्रित झाले. ह्या त्रिदेवांनी काहीही न खाता उपोषण केले आणि त्यांच्या ऊर्जेने एक शक्ती तयार केली आणि तिला एकादशी हे नाव दिले. ह्या एकादशी ने उन्मत्त मृदूमान्य दैत्याला ठार मारले. त्या एकादशीच्या स्मरणार्थ ह्या त्रिदेवांच्या उपासनेसाठी  हे व्रत सुरु झाले.
 
ह्या व्रतामध्ये विठ्ठल/विष्णू पूजन, उपवास आणि भजन-कीर्तन केले जाते. उपवास हा शब्द संस्कृत ‘उपविश' म्हणजे जवळ बसणे ह्या शब्दापासून आलेला आहे. हे बसणे गुरुच्या सन्निध बसून काहीतरी पारमार्थिक ज्ञान प्राप्त करणे अशा अर्थी आहे. एकादशीच्या उपोषणा सोबत आपणही उपासनेच्या मार्गाने संत शिकवणीचे चिंतन करु शकतो.
 
आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या दर्शना साठी पंढरपूरला आज जी लाखो वैष्णवांची वारी जाते ती शेकडो वर्षांची जुनी परंपरा आहे. पूर्वी विठ्ठलपंत (ज्ञान देवांचे वडिल), ज्ञानदेव, तुकाराम आणि नारायण (तुकारामांचा मुलगा) हे विठ्ठल दर्शनाला जात असत. आज त्याच परंपरेने लाखो वारकरी/वैष्णव आळंदी पासून उन्हा पावसाची तमा न बाळगता दिंड्या पताका घेऊन शिस्तबद्ध पद्धतीने चालत पंढरपूरला जातात. ही वारी हे जगातले एक अद्वितीय आश्चर्य आणि महाराष्ट्राचे सांस्कृतिक ऐश्वर्य आहे. अनेक ठिकाणचे, अनेक पंथाचे, अबाल वृध्द्व एकाच अध्यात्मिक शक्तिने ह्या वारीमध्ये सहभागी होतात. संतांना अपेक्षित असलेली समानता इथे आहे. वारकरी प्रत्येकामध्ये परमेश्वर पाहतात, एकमेकांना माऊली म्हणून हाका मारतात. ही मानवता आहे. माणूस म्हणून एकमेकांना जवळ आणण्याची क्षमता वारी मध्ये आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे विठ्ठलावरची/परमेश्वरावरची नितांत श्रध्दा आणि त्यायोगे सकारात्मक विचारांची मानसिकता होय. विश्व कल्याणाची तळमळ असणाऱ्या ज्ञानदेवांनी ह्याच हेतूने हा पायंडा सुरु केला असावा असे समजले तर योग्यच होईल.
 
त्या निमित्ताने ही संत संगती आपण संत शिरोमणी ज्ञानदेवांच्या कीर्तनाने (जे कीर्ती सांगते ते कीर्तन) सुरु करुया.
 
ज्ञानदेवांची थोरवी सांगताना नामदेव म्हणतात-

ज्ञानराज माझी योग्यांची माउली ।। जेणे निगमवल्ली प्रगट केली ।।
गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ।। ब्रम्हानंद लहरी प्रगट केली ||

 
ज्ञानेश्वरांनी निगमवल्ली प्रगट केली ह्या एका वाक्यात त्यांचा सार्थ गौरव केला आहे. निगम म्हणजे 'वेद'. हे जगातील प्राचीनतम वाङ्गमय आहे. हे खरोखरी ज्ञानाचे भांडार आहे. ह्या मध्ये विश्वाचे मूळ स्वरुप, देवता, यज्ञ, मानवाचे सत्य स्वरूप इतिहास, भूगोल, वेगवेगळी शास्त्रे असे अनेक विषय आहेत. अशा अनेक प्रकारच्या शास्त्र शुद्ध ज्ञानाचा हा विशाल खजिना ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद अशा चार वेदांमध्ये विस्तारीत केलेला आहे. आणि अशा ह्या निगमाची, वेदांची वल्ली म्हणजे वेल ज्ञानदेवांनी प्रगट केली म्हणजे, आपल्याला त्याचे स्वरूप सांगितले.
 
ज्ञानेश्वर महाराजांचे वडील विठ्ठलपंत हे अतिशय वैराग्यशाली, धर्म परायण हरिभक्त होते.

नित्य हरिकथा नाम संकीर्तन संतांचे दर्शन सर्वकाळ ।।

असा त्यांचा दिनक्रम होता. प्रापंचिक संसारात त्यांचे मन अजिबात रमत नव्हते. म्हणून विरक्तीच्या भावनेने त्यांनी संन्यास घेतला होता. परंतु गुरु आज्ञेने ते संन्यासाश्रमातून गृहस्थाश्रमात परत आले. ही गोष्ट त्या कालातील जन रूढींच्या विरुद्ध होती. त्यांचे आप्त, स्नेही सुद्धा त्यांची उपेक्षा करु लागले. त्या काळात ते जन नींदेचा विषय झाले होते. सर्व लोकांनी त्यांना वाळीत टाकले. अतिशय विपन्न अवस्थेत हे पति पत्नी गावाच्या बाहेर राहू लागले.
 
परंतु ह्या कालावधीत विठ्ठलपंतांनी एकाग्रतेने वेद वाङ्गमय, धार्मिक ग्रंथ, संत चरित्रांचे भरपूर वाचन केले. आणि हीच त्यांची साधना त्यांच्या चारही ज्ञानजन्य मुलांच्या ज्ञानार्जनाचा ज्ञानसागर झाली. ह्या पारमार्थिक तपाच्या अखेरीस त्यांना निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपानदेव आणि मुक्ताबाई ही चार अपत्ये झाली.
 
शालिवाहन शके अकराशे नव्वद । निवृत्ति आनन्द प्रगटले
त्र्याणवाच्या साली ज्ञानेश्वर प्रगटले I सोपान देखिले शाणणवात
नव्याणवाच्या साली मुक्ताबाई देखीली I जनी म्हणे केली मात त्यांनी (संत जनाबाई अभंग २७७)


जनाबाईंनी ह्या भावंडांचा जन्मकाल त्यांच्या अभंगामध्ये असा सांगितला आहे.
 
बाह्य परिस्थिती प्रतिकूल असताना चारही मुलांवर विठ्ठलपंतांनी अतिशय उत्तम संस्कार केले होते. सहानुभूति शून्य वातावरणात ह्या भावंडांनीही उत्तम प्रकारे विद्याभ्यास केला. परंतु समाज ह्या निष्पाप मुलांचे दर्शन सुध्दा अपशकुन समजत असे. ह्या मुलांचे उपनयन संस्कार करण्यासाठी देखील कोणी तयार नव्हते.
 
आपल्या मुलांच्या हाल अपेष्टा बघून आणि त्यांच्या भविष्याच्या काळजीने विठ्ठलपंत चिंतेत होते. ह्या असाह्य परिस्थितीतून काही तरी मार्ग काढण्यासाठी त्यांनी ब्रह्मवृन्दाची सभा बोलवली आणि क्षमा प्रार्थना केली. त्याचा तोडगा म्हणून त्या निर्दयी भावना शून्य लोकांनी त्यांना देहान्त प्रायश्चित्त सांगितले; आणि मुलांच्या कल्याणासाठी विठ्ठलपंतांनी ते स्वीकारले. अगदी लहान वयात ह्या मुलांचे आई-वडिलांचे छत्रच हरवले. तरीही ह्या मुलांच्या भविष्याचा प्रश्न सुटला नव्हता. म्हणून निवृत्तीनाथांनी तोच प्रश्न विचारल्यावर लोकांनी त्यांना परत पैठणला जाऊन तेथील ब्रह्मवृन्दाचा निर्णय आणायला सांगितला.
 
हे चौघे जण पैठणला गेले. तेथे सभा बोलावली असताना स्वतःला विद्वान समजणारे काही लोक ह्यांची टिंगल करीत होते. “ह्या गावात ‘ग्याना’ नावाचा एक रेडा पण आहे. नाव ज्ञाना/ग्याना असले म्हणून काय कोणी ज्ञानी होतो का?” असे त्या निर्बुद्धांनी म्हणताच ज्ञानेश्वर अतिशय नम्रपणे म्हणाले की तुम्ही म्हणता ते खरे आहे. “बोलवा त्या रेड्याला. त्या रेड्याचा आणि माझा आत्मा एकच आहे. मी ऋग्वेदातील ज्या ऋचा म्हणेन त्याच ऋचा तो रेडा म्हणेल”. ज्ञानदेवांनी ज्या ऋचा म्हणल्या त्याच ऋचा रेडयाने म्हणल्या आणि सभेमधील उपस्थितांना, सर्व पैठणकरांना ह्या भावंडांचे सामर्थ्य समजले. ह्या योगी, ज्ञानी मुलांना प्रायश्चित्त काय आणि कशा करिता द्यायचे असाच विचार ब्रह्मवृन्दानी केला आणि त्यांचे सन्मानाने स्वागत केले आणि त्यांना शुद्धिपत्र दिले.
 
हे परलोकीचे तारूदेवत्रय यासी । प्रायश्चित्त काय यासी द्यावे कोणी ।।
 

असा आशय नामदेवांनी दिला आहे.
 
वेद व्याख्यान, हरि कीर्तन, पुराण कथन करणे असा ह्या चारही जणांचा दिनक्रम सुरु असे. म्हाळसापूर, नेवासे येथे एका मुक्कामात शके १२१२ मध्ये ज्ञानदेवांनी श्रीमद्भगवत गीतेवरील टीका सांगितली आणि ती ‘ज्ञानेश्वरी’ ग्रंथ लिखित प्रत तयार झाली. श्रीमद् भगवतगीता ही अध्यात्म आणि तत्वज्ञानाचे सर्वोत्तम सार आहे. हीच्या वाचनाने जीवन कसे जगावे ह्याचे मार्गदर्शन होते. ज्ञान प्राप्तीने समाधान मिळते, आनन्द मिळतो म्हणून गीतेला ‘योगोपनिषद’ असे म्हणले जाते. परंतु संस्कृत भाषेमधील हे शास्त्र, काव्य, विद्या, संवाद सर्व सामान्य माणसांनाही वाचता यावे व सहज पणे समजून त्याचा लाभ व्हावा ह्या हेतूने ज्ञानदेवांनी सुमारे ९००० ओव्यांचा ‘ज्ञानेश्वरी’ हा ग्रंथ लिहिला.
 
ज्या समाजाने अपमानास्पद वागणूक दिली, ज्या समाजाच्या अवहेलनेने आई वडिलांनी देहत्याग केला त्याच समाजासाठी हे लेखन करताना ज्ञानदेवांचा उदात्त हेतू आणि निर्मल मन प्रतिबिंबित होते. ज्ञानेश्वरी मध्ये भक्ती रस आहे, अद्वैत अनुभूती आहे आणि अज्ञान नाहीसे होऊन परमानंद प्राप्ती हे प्रयोजन आहे. हे सखोल विचारांचे, भावनांचे भांडार आहे असे नामदेव म्हणतात.
 
नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवावी ।।
 
ज्ञानेश्वरी व्यतिरिक्त ज्ञानदेवांनी इतरही लेखन केले आहे. गुरु निवृत्तीनाथांच्या आज्ञे वरुन ‘अमृतानुभव’ हा ग्रंथ सुद्धा लिहिला. अमृतानुभव ग्रंथामध्ये जीव आणि परब्रह्म ऐक्याचे शुद्ध तत्वज्ञान सांगितले आहे. नामपाठासाठी हरी पाठाचे अभंग आणि इतरही अनेक अभंग लिहिले आहेत.
 
ज्ञानदेवांनी रेड्याच्या मुखातून वेद वदवले तेंव्हा ही अद्भुत घटना सर्वदूर पसरली होती. त्या काळात चांगदेव महाराज प्रसिद्ध होते. योग बळाने १४०० वर्षे आयुष्य लाभलेल्या चांगदेवांच्या कानावर ही बातमी गेली. तेंव्हा ह्या महान विभूतीला भेटावे असे त्यांच्या मनात आले. भेटी पूर्वी आपण येत असल्याचे कळवण्यासाठी त्यांनी ज्ञानदेवांना पत्र लिहिले. ते आपल्यापेक्षा वयाने लहान आहेत तेंव्हा पत्राची सुरवात नमस्कार का आशीर्वाद उल्लेखाने करावी ह्या संभ्रमात त्यांनी पत्र कोरेच पाठवले.
 
त्या पत्राच्या उत्तरासाठी ज्ञानदेवांनी जे ६५ ओव्यांचे अहंकार नष्ट करणारे लेखन केले. ते लेखन ‘चांगदेव पासष्ठी’ नावाने प्रसिद्ध आहे. चांगदेवा तुझ्या माझ्यातील एकत्वाची स्थिती ह्या पत्रा मध्ये लिहिली आहे. तिच्या साहाय्याने तू आत्मस्वरूप जाणून घे आणि मी ब्रह्मस्वरूप आहे ह्या बोधाने तू आनंदात राहा असा आशय त्या मध्ये आहे. चांगदेव वाघावर बसून, हातात सापाचा चाबूक घेऊन ज्ञानदेवांना भेटायला आले. तेंव्हा ज्ञानदेव त्यांच्या भावंडांसमवेत एका भिंतीवर बसले होते. चांगदेव समोर दिसताच ज्ञानदेवांनी ती निर्जीव भिंत चालवत त्यांच्या दिशेने नेली. हे पाहून चांगदेवांचा सर्व अहंकार संपला आणि ते ज्ञानदेवांना शरण आले.
 
ज्ञानदेवांचे मराठी भाषेवर खूप प्रेम होते.
माझा मराठीचि बोलू कौतुके परि अमृतातेहि पैजांसी जिंके I ऐसी अक्षरे रसिके मेळवीन ।। (ज्ञान. . -ओवी १४),
अमृतालाही पैजेनी जिंकणारी अक्षरे, असे म्हणत त्यांनी मराठी भाषेविषयीचा अभिमान व मराठीची महती व्यक्त केली आहे.
 
ज्ञानदेवांच्या भाषेत अलौकीक सौंदर्य आहे. उदात्त विचार आणि अध्यात्मिक एकतेचे बीज आहे. त्यांचे सर्व वाङ्गमय हे अक्षर वाङ्गमय आहे. म्हणजे अनंत काळासाठी मौलिक आहे.
ज्ञानदेवांनी सर्वतोपरी समाज हितासाठी प्रबोधन केले आहे. त्या यादव काळामध्ये अनेक धर्मपंथ होते. शिवाची उपासना करणारे ‘शैव’, विष्णूची उपासना करणारे ‘वैष्णव’, देवीची उपासना करणारे ‘शाक्त’ आणि इतरही अनेक पंथ होते. आणि प्रत्येक पंथाचे लोक एकमेकांना विरोध करत संघर्ष करीत होते. तेंव्हा ज्ञानेश्वरांनी "हरिहर" ऐक्याची संकल्पना सांगून ही एकाच परमेश्वराची रूपे आहेत हे पटवून दिले. आणि संघर्ष नाहीसा केला. तसेच, स्त्रिया आणि शूद्रांना फारच बंधन कारक वागणूक दिली जात होती. ज्ञानदेवांनी ह्या विषमता वादाला विरोध केला. सर्व स्तरातील स्त्री पुरुषांना भक्तिचा अधिकार आहे हे सांगून अध्यात्मिक न्याय मिळवून दिला आणि साधी सोपी उपासना सांगितली. आज पंढरपूर वारी मध्ये सर्व पंथातील स्त्री-पुरुष तीच साधी सोपी उपासना मनापासून करतात. एकादशीला प्रत्यक्ष मंदिरात जाणे जमले नाही तरी ‘कळस दर्शनात’ विठ्ठल दर्शनाचा आनंद मानतात. निकोप सामाजिक एकतेसाठी ज्ञानदेवांचे हे मोठे योगदान आहे.
 
ह्या सर्व कार्या नंतर आपले इहलोकीचे कार्य पूर्ण झाले असे वाटून ज्ञानदेव पंढरपूरला गेले आणि श्री विठ्ठलाकडे समाधी घेण्याची परवानगी मागितली. त्यांच्या ह्या निर्णयाने सर्वांना अतीव दुःख झाले.
 
 ज्ञानेश्वर आळंदीला आले. इंद्रायणी नदीच्या काठी, सिद्धेश्वर मंदिरा समोर समाधी स्थान निश्चित केले आणि समाधी घेण्यापूर्वी त्यांनी अतिशय निश्चल वृत्तीने १०९ ओव्यांची श्री भगवंताची स्तुती केली. वयाच्या २१ व्या वर्षी कार्तिक वद्य त्रयोदशीला ह्या ज्ञानेश्वर माउलींनी संजीवन समाधी घेतली. आजही तेथे त्यांच्या शुद्ध सात्विक अध्यात्मिक भक्ती-भावनेची अनुभूती येते.
 
दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्ये पाहो । जो जे वांछील तो ते लाहो I प्राणिजात ||
 
विश्व कल्याणाचे असे पसायदान मागणाऱ्या ज्ञानेश्वरांना सर्व भक्त प्रेमाने माउली म्हणतात. आपणही त्यांना वंदन करुया. ह्या आषाढी एकादशीला ज्ञानेश्वर माउलींच्या अनुभवातील वैचारिक वारी ने संत संगतीचा आनंद घेऊया.
 
 तपेवीण दैवत दिधल्यावीण प्राप्त गुजेवीण हित कोण सांगे । ज्ञानदेव मार्ग दृष्टांताचि मात साधूचे संगती तरुणोपाय ।।( हरिपाठ -/}

 

 

Copyright © *|CURRENT_YEAR|* *|LIST:COMPANY|*, All rights reserved.
*|IFNOT:ARCHIVE_PAGE|* *|LIST:DESCRIPTION|*

Our mailing address is:
*|HTML:LIST_ADDRESS_HTML|* *|END:IF|*

Want to change how you receive these emails?
You can update your preferences or unsubscribe from this list.

*|IF:REWARDS|* *|HTML:REWARDS|* *|END:IF|*

SGYP Blog: स्वामी स्वरूपानंद

*|MC:SUBJECT|*
View this email in your browser

 स्वामी स्वरूपानंद

- सौ जयश्री काजरेकर

 
श्रावण शुक्ल एकादशी ही "पुत्रदा एकादशी" आहे. प्रत्येक एकादशीच्या नावामागे काही कथा संदर्भ आहेत तशी ह्या ही एकादशीच्या नावामागे एक कथा आहे. सुकेतु राजाने आपल्या पत्नीसह पुत्र प्राप्तीसाठी ह्या एकादशीला हे व्रत केल्याचा पौराणिक संदर्भ आहे. म्हणून ही पुत्रदा एकादशी.
परंतु आपली संस्कृती सम्रुद्ध आणि व्यापक विचारांची आहे. एकादशीचे व्रत करताना स्वतःला मुलगाच किंवा मुलगी प्राप्त होऊ दे असा संकुचित विचार असणे योग्य नाही. संत संगतीच्या पहिल्या सत्रात एकादशीची उत्पत्ती त्रिदेवांच्या सात्विक ऊर्जेतून झाली हे आपण जाणले आहे. आणि संत ज्ञानेश्वरांना आपण माउली म्हणतो म्हणजे आपण सर्व भक्त त्यांना लेकरांसारखेच आहोत. ह्या विचारांच्या आधारे आपणही पुत्रदा एकादशीला माझ्या कुटूंबाचे, माझ्या मुलांचे कल्याण होऊ दे अशी सकाम भक्ति न करता सध्याच्या वैश्विक संकटातून सर्व मुला, मुलींचे संरक्षण होऊ देत आणि ही भावी पिढी शारीरिक, वैचारिक आरोग्यासहित उज्वल प्रगती करू देत अशी प्रार्थना केली तर खऱ्या अर्थाने संत संगती सुरु झाली हे आपल्या मनाला पटेल.
 
एकादशीचे नाव फक्त त्या महिन्याच्या संदर्भासाठी आहे असे समजून त्या दिवशी विष्णू पूजन, श्रीहरि कथा, कीर्तन आणि जमल्यास उपोषण हा परिपाठ समाधानकारक राहील.
 
आषाढी एकादशी पाठोपाठ 'गुरू पौर्णिमा/ व्यास पौर्णिमा’ साजरी केली जाते. महर्षि व्यासांनी वेदांची पुनर्रचना केली त्यामुळेच त्यांना व्यास हे नाव मिळाले. ४वेद, सर्व शास्त्रे, १८ पुराणे, महाभारत, काही सुंदर स्तोत्रे ही महान ग्रन्थ संपादना आपल्यासाठी तयार केली. म्हणूनच "व्यासोच्छिष्ट्म जगत सर्वम" (जगातील सर्व विषय व्यासांनी पूर्वीच स्पर्शिले आहेत) असे म्हणले जाते. त्यांच्या ह्या अलौकिक प्रतिभेला वंदन करण्यासाठी, त्यांचे स्मरण करण्यासाठी गुरु पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हणले जाते. गुरू पूजन करून आपण कृतज्ञता व्यक्त करतो. पारमार्थिक मार्गावर अध्यात्मिक गुरु आपल्याला मार्गदर्शन करतात आणि आपली निर्णायक दिशेंने वाटचाल सुरु होते. आपल्या जीवनात गुरूंचे स्थान अनन्य साधारण आहे. असे समजले जाते की भगवान शंकर हे आदि गुरु आहेत आणि पुढे ही गुरु परंपरा आज तागायत वेगवेगळ्या शाखां मधून अव्याहत सुरु आहे.
 
ह्या एकादशीला आपण नाथ संप्रदायातील गुरु परंपरेतील संत ज्ञानेश्वरांचे साधक अनुयायी स्वामी स्वरूपानंदांचा सत्संग अनुभवणार आहोत.
 
महाराष्टातील रत्नागिरी शहरापासून ८ मैल अंतरावर पावस हे निसर्गरम्य ठिकाण आहे. गौतमी नदीच्या तीरावर असलेल्या ह्या पावस च्या भूमी मध्ये (मार्गशीर्ष वद्य द्वादशी शके १८२५) १५ डिसेम्बर १९०३ ह्या दिवशी रामचंद्र विष्णुपंत गोडबोलेंचा जन्म झाला. जे गीतेच्या अभ्यासपूर्ण अनुकरणाने "स्वामी स्वरूपानंद" ह्या संत पदाला पोहचले.
 
स्वामींजींच्या घराण्याचा पूर्वीपासूनच नाव लौकिक होता. त्यांचे पूर्वज पौरोहित्य करीत होते. आजोबा पर्शरामपंत शिक्षण खात्यामध्ये अधिकारी होते. घरी नेहमी अतिथी अभ्यागतांचे वास्तव्य असायचे. त्यांच्या आजी नकळत घडलेल्या अपराधाचे प्रायश्चित घेण्याच्या निमित्ताने अनेक वर्ष नर्सोबाची वाडी ह्या पुण्य क्षेत्रामध्ये साधना करीत होत्या. स्वामीं चे वडील विष्णुपंत आणि मातोश्री रखमाबाई दोघेही परमार्थामध्ये मन रमवणारे होते. मानमान्यतेच्या पोकळ गोष्टींची त्यांना अजिबात आवड नव्हती. दिवसामधील अधिकतर वेळ ते परमेश्वर चिंतनात रमत असत. विष्णुपंत पावस येथील स्वयंभू विश्वेशाची अनन्य भक्ति करीत असत. अशा ह्या तपस्येच्या वातावरणात स्वामींचे बालपण भक्ति, निष्ठेचे संस्कार ग्रहण करीत होते. त्यांचे शालेय शिक्षण सुरु झाले तेंव्हा त्यांच्या बुद्धिमत्तेची व्याप्ती दिसू लागली. सर्व विषयामध्ये ते पारंगत होतेच आणि संस्कृत विषय विशेष आवडीचा होता. संस्कृत विषयात त्यांची प्रगती अप्रतिम होती. त्यामुळे त्यांना देवादिकांच्या गोष्टी आणि श्रीमद् भगवद् गीता अध्ययनाची गोडी निर्माण झाली.

 I बाल्यापासूनि गीताध्ययनी होता मज बहु छंद I असे स्वामींनी नमूद केले आहे.
 
पावस, रत्नांगिरी येथे शालेय शिक्षण झाल्यानंतर पुढील शिक्षणाकरिता ते मुंबईला आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या विद्यालयात गेले होते. तो काळ पारतंत्र्याचा होता. ब्रिटीश राजवट नको असल्याने तरुणांमध्ये स्वातन्त्रासाठी प्रयत्न करण्याचा उत्साह होता. मुंबईमधील शिक्षण पूर्ण होण्या पूर्वी स्वामींनी टिळक विद्यापीठाची प्रवेश परीक्षा देऊन ते महात्मा गांधींनी सुरू केलेल्या असहकार चळवळीत सामील झाले. ह्या शैक्षणिक कालखंडातही त्यांचे अध्यात्म विषयाचे वाचन, श्रवण, निदिध्यासन अखंडपणे सुरु होते. लहानपणापासून केलेल्या भगवद् गीतेच्या अभ्यासाचा त्यांच्या मनावर प्रभाव होता. धर्माच्या स्थापनेसाठी कर्तव्य करीत राहिले पाहिजे. मात्र ह्या कर्तव्याच्या फलाची अपेक्षा करावयाची नाही, हे तत्व जाणून राष्ट्रोध्दारासाठी तरुणांना स्वावलंबन शिकवले पाहिजे ह्या विचाराने स्वामींनी पावस येथे ‘स्वावलंबनाश्रम’ सुरु केला. ह्या संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणा सोबत स्वावलंबनासाठी मार्गदर्शन केले जात होते. समाजातील नीतिमूल्ये वाढवण्यासाठी तळमळीने आणि स्वखर्चाने हे काम स्वामी करीत होते. समाजात अध्यात्माची गोडी वाढवण्यासाठी ते प्रवचने करीत होते. त्यांच्या ह्या कार्याने समाजात त्यांना एक आदराचे स्थान तयार झाले होते.
 
राष्ट्रभक्तिच्या प्रेरणेसोबत मनामध्ये सद्गुरू कृपेची तीव्र तळमळ सुरु होती. १९२३ साली त्यांचे मामा केशवराव गोखले त्यांना घेऊन पुण्याला बाबा महाराजांकडे दर्शनाला गेले. त्या भेटी मध्ये शिष्याची ही मनोकामना गुरुंनी जाणली. नाथ संप्रदायातील बाबा महाराज गणेशनाथांनी त्यांना अनुग्रह दिला. अनुग्रह दिल्यानंतर गुरुंनी त्यांना “स्वरूपानंद” ह्या नावाने संबोधन केले.
 
जे विश्वरूपामध्ये स्वरूप पाहतात आणि स्वरूपा मध्ये विश्वरूप पाहतात ते स्वरूपानंद.
 
त्यानंतर स्वामींची वृत्ती अध्यात्मामध्ये अधिकच रमू लागली. देशहितासाठी सामाजिक बांधिलकी आणि आत्मोन्नत्तीसाठी पारमार्थिक प्रगती दोन्ही गोष्टी सुरु होत्या. गांधीजींच्या सोबत मिठाच्या सत्याग्रहात स्वामी सामील झाले होते. त्यामुळे १९३२ मध्ये त्यांना कारावासात ठेवले होते. स्वातंत्र्य लढ्यातील कामगिरीचा गौरव करण्यासाठी पुढे त्यांच्या जन्म-शताब्दीला टपाल खात्याने त्यांचे चित्र असलेले तिकीट मुद्रित केले होते. जेल मधील एकांत हा त्यांच्यासाठी इष्टापत्ती होती. त्या वेळेत देह बुद्धी कडून आत्म बुद्धीकडे जाण्याचा मार्ग त्यांनी समजून घेतला. आणि इथेच सोsहं साधनेची सुरवात झाली.
 
अनुग्रहानंतर स्वामींनी संपूर्ण ज्ञानेश्वरी स्वहस्ते लिहून गुरुंना अर्पण केली. ज्ञानेश्वर माउलींच्या गुरु परंपरेतून सुरु असलेल्या तत्वांचा प्रसार २० व्या शतकात सुरू ठेवला. गीतेच्या मूळ ७०० श्लोकांवर ज्ञानेश्वरांनी ९००० ओव्यान्ची ज्ञानेश्वरी लिहिली आणि स्वामींनी तोच आशय कायम ठेवून जवळपास २०,००० ओव्यामध्ये अभंग ज्ञानेश्वरी लिहून कर्म योग, ज्ञान योग आणि भक्ति योग जन मानसात पोहचवला.
 
पुढे १९३४ च्या सुमारास त्यांची प्रकृती ठीक नव्हती. सामान्य माणूस आजारी  पणात दुखण्याची चिंता करतो, असामान्य माणसे ईश्वर चिंतनात मग्न होतात.  प्रारब्ध  भोग सर्वांनाच असतात तेंव्हा काळजी करण्या पेक्षा काळजी घेणे हे जमले पाहिजे. साक्षात मृत्यू समोर दिसत असताना स्वामी सोsहं साधनेने निर्भय झाले. सोsहं (स:+अहं) तो परमात्मा मीच आहे. अशी दृढ श्रद्धा मनात ठेवायची, आसनस्थ होऊन, आपल्या श्वासावर लक्ष पूर्ण केंद्रित करुन साक्षेपे म्हणजे निवांत चित्ताने ध्यान धारणा केली असता देह बुद्धी वरून (मी, माझे नाव, माझा देह म्हणजे देह बुद्धी आणि मी म्हणजे आत्मा ही आत्मबुद्धी) हळू हळू आत्म बुद्धीची जाणीव होऊ लागते. स्वामींनी ही साधना केली, तपश्चर्या केली. ह्या साधना काळामध्ये त्यांना सगुण साक्षात्कार झाला. ज्या तपश्चर्येचा त्यांनी स्वतः आनंद घेतला त्याच सोsहं संप्रदायाच्या साधनेच्या  तत्वज्ञानाचा प्रसार स्वामींनी केला. ते तत्वज्ञान आजच्या काळात झेपेल असे सोपे करून सांगितले.
 
ते सांगतात, सतत अनुसंधानाने आपले स्वरूप साक्षीत्वाने ओळखता यायला पाहिजे.
 
अंतरी सतत करी सोsहं ध्यान । न जाई गुंतुन संसारात ।
धन,सूत,दारा असू दे पसारा । नको देऊ थारा आसक्तीते ।

 
त्यांच्या शिकवणी मध्ये भक्ति, नाम आणि सोsहं साधना ह्यांच्या जोडीने भेद भाव न करण्यासाठी पण उपदेश आहे.
 
एका अभंगात ते सांगतात -
भेद भाव मळ गोळा अमंगळ । भेदा भेद धर्म बंधनाच्या पलीकडे ।
 

राष्ट्र सेवा, अध्यात्मिक साधना, गीतेचा, संत वाङ्गमयाचा अभ्यास हाच स्वामींचा प्रपंच होता. ते गृहस्थाश्रमात रमले नव्हते. कौटुंबिक बंधने तशी नव्हती तरी १९३५ साली त्यांनी क्षेत्र संन्यास घेतला. सध्याचे कोकण मेव्याचे/हापूस आंब्याचे प्रसिद्ध उद्योजक श्री देसाई ह्यांच्या आग्रहाने त्यांच्या पावस येथीलS ‘अनंत निवास’ मध्ये वास्तव्य केले. ह्या एका वास्तूत एकाग्रतेने त्यांनी एक  वाङ्गमय  सृष्टी निर्माण केली. गीतेवरील ‘भावार्थ गीता’ हा साकीबद्ध अनुवाद प्रथम लिहीला. अनेक अभंगाच्या रचनेची ‘संजीवनी गाथा’ लिहीली. ह्या दोन प्रासादिक ग्रंथांच्या प्रकाशनानंतर जाणकर लोकांना त्यांचे व्यक्तिमत्व भावले, लोकसंग्रह वाढला आणि सन्मानाने ते स्वामी म्हणून ओळखले जाऊ लागले. पुढे ज्ञानेश्वरी, अमृतानुभ, चांगदेव पासष्टी ह्या माउलींच्या ग्रंथांचा अभंग अनुवाद केला तसेच नाथ संप्रदायाच्या ग्रंथांचा अभ्यास करून सुलभ ग्रंथ संपदा तयार केली आणि ह्या प्रासादिक ज्ञानाचा प्रसाद मुक्त हस्ताने वाटला. स्वामी सुहृद भक्तांना पत्रे लिहीत असत. त्या काळात संपर्काचे चे ते पण एक साधन वापरात होते. ‘स्वरूप पत्र मंजुषा’ म्हणून ओवी बद्ध पत्रांचा तो संग्रह प्रसिद्ध आहे. एका पत्रात त्यांनी रवींद्रनाथ टागोरांच्या ‘गीतांजली’ काव्य संग्रहातील संदर्भ दिला होता.
 
I विपदि मोरे रक्सवा कोरो I
 
‘परमेश्वरा विपत्तीत माझे रक्षण कर ही माझी प्रार्थना नाही. मला विपत्तीत न भीता, चित्त स्थिर ठेऊन काम करण्यासाठी शक्ती दे’. ते पुढे सांगतात की – ‘संसारात काही कर्तव्ये दुःख सोसून करावी लागतात. ती ही स्थिर मनाने करावीत’.
 
सुहास वदन, प्रसन्न दर्शन, निर्मल अंतःकरण, मित मधु भाषण, शुद्ध मन तथा सदैव सत्याचरण एवं षडविध सज्जन लक्षण अंगी बाणता पूर्ण होतो वश परमेश ।
 
सज्जनांच्या ह्या सहा गुणांना अंगिकारण्यासाठी ते आग्रही असत. स्वामींच्या ह्या शिकवणीमध्ये त्यांनी स्वतः आणि इतर ही संतांनी भक्ती योगाने जे प्रत्यक्ष अनुभव घेतले त्याचे सार आहे. पुढील एकच श्लोक संस्कृत, प्राकृत आणि मराठी मध्ये क्रमा क्रमाने दिला आहे. गीते मधील तत्वज्ञान हे संत आपल्याला सहज पणे कसे उलगडवून दाखवतात त्याचे हे सुंदर उदाहरण आहे.
 
भक्त्या मामभिजानाति यावान्यश्चास्मि तत्त्वतः ।
ततॊ मां तत्वतो ज्ञात्वा विशते तद्नंतरम ।।
(गीता १८--५५)
 
या ज्ञानभक्ति सहज । भक्तु एकवटला मज । तो मीचि केवळ हें तुज श्रुत ही आहे| (ज्ञानेश्वरी १८-११३०)
 
ज्ञान भक्तीनें हया । भक्त जो स्वभावें । एकत्वासी पावे । माझ्या ठायीं ।
मी चि तो केवळ ।होवोनिया राहें ।ठावे तुज आहे| आघवे हें (अभंग ज्ञानेश्वरी १८-१९३८)
 
स्वरुप -आंनद –म्हणजे--स्वतःमधील आत्मरुप ओळखून आंनदाने निष्काम कर्म करणारे हे कर्मयोगी होते. १५ ऑगस्ट १९७४ या दिवशी स्वामींनी महासमाधी घेतली. पावसला त्यांचा जन्म ज्या वास्तु मध्ये झाला होता त्या परिसरात समाधी मंदिर आहे. त्या मंदिरात त्यांच्या तत्व मार्गदर्शना प्रमाणे भक्ति पूर्ण भावाने साधना, ध्यान धारणा, अन्नदान आणि सामाजिक सेवा सुरु आहे.
 
ह्या एकादशीला आपण स्वामींच्या शिकवणी प्रमाणे भावी पिढीच्या उन्नतीसाठी, त्यांच्या स्वावलंबन युक्त भविष्यासाठी, व्रत करूया आणि संत संगतीची वारी पुढे नेऊया.
 
ह्या वारी मध्ये एक विशेष पर्वणी आहे. श्री गणेशयाग परिवाराने देशो देशीच्या गणेश भक्तांसह 'अथर्वशीर्ष' पठणाचा संकल्प केला आहे. करोना संकट निवारण होण्यासाठी विश्व कल्याणाची प्रार्थना करायची आहे. त्यासाठी आपण सर्वांनी दररोज शक्य असेल तर २१ वेळा २१ ऑगस्ट पर्यंत अथर्वशीर्षाचे पहिले १० श्लोक प्रार्थनापूर्वक म्हणायचे आहेत. आपण निष्काम भक्ति करीत आहोत त्यामुळे फलशृती म्हणायची आवश्यकता नाही. विघ्न हर्त्या श्रीगणेशाच्या चरणी संकल्प पूर्तीसाठी विशेष प्रार्थना.
 
-सौ जयश्री काजरेकर.
 

 

Copyright © *|CURRENT_YEAR|* *|LIST:COMPANY|*, All rights reserved.
*|IFNOT:ARCHIVE_PAGE|* *|LIST:DESCRIPTION|*

Our mailing address is:
*|HTML:LIST_ADDRESS_HTML|* *|END:IF|*

Want to change how you receive these emails?
You can update your preferences or unsubscribe from this list.

*|IF:REWARDS|* *|HTML:REWARDS|* *|END:IF|*

SGYP Blog: संत ज्ञानेश्वर

*|MC:SUBJECT|*
View this email in your browser
Facebook
Website
Email
YouTube

संत ज्ञानेश्वर

- सौ जयश्री काजरेकर


पूर्व संकल्पाप्रमाणे १ जुलै च्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने आपण संत संगतीचा सत्संग करणार आहोत. आषाढी एकादशी, उपवास आणि वारी ह्या तीन गोष्टी एकाच श्रद्धेने निगडित आहेत. ती म्हणजे पंढरपूरच्या विठोबाच्या दर्शनाची ओढ. ह्या एकादशी पासून कार्तिकी एकादशी पर्यंत भगवान विष्णू, क्षीरसागरात शेष शय्येवर झोपी जातात म्हणून ह्या एकादशीला ‘देव शयनी’ एकादशी हे नाव आहे.
 
एकादशी संबधी एक पौराणिक कथा आहे. ‘मृदूमान्य’ नावाच्या शिवभक्त दैत्याने भगवान शंकरांकडून अमर राहण्यासाठी एक वर मागून घेतला. आपला मृत्यू कोणा पुरुषा कडून होणार नाही हा वर मिळताच त्या दैत्याने सर्व देवांना पराभूत करण्याचे ठरवले. तेंव्हा ब्रह्मा, विष्णू आणि महेश एका गुहेत एकत्रित झाले. ह्या त्रिदेवांनी काहीही न खाता उपोषण केले आणि त्यांच्या ऊर्जेने एक शक्ती तयार केली आणि तिला एकादशी हे नाव दिले. ह्या एकादशी ने उन्मत्त मृदूमान्य दैत्याला ठार मारले. त्या एकादशीच्या स्मरणार्थ ह्या त्रिदेवांच्या उपासनेसाठी  हे व्रत सुरु झाले.
 
ह्या व्रतामध्ये विठ्ठल/विष्णू पूजन, उपवास आणि भजन-कीर्तन केले जाते. उपवास हा शब्द संस्कृत ‘उपविश' म्हणजे जवळ बसणे ह्या शब्दापासून आलेला आहे. हे बसणे गुरुच्या सन्निध बसून काहीतरी पारमार्थिक ज्ञान प्राप्त करणे अशा अर्थी आहे. एकादशीच्या उपोषणा सोबत आपणही उपासनेच्या मार्गाने संत शिकवणीचे चिंतन करु शकतो.
 
आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या दर्शना साठी पंढरपूरला आज जी लाखो वैष्णवांची वारी जाते ती शेकडो वर्षांची जुनी परंपरा आहे. पूर्वी विठ्ठलपंत (ज्ञान देवांचे वडिल), ज्ञानदेव, तुकाराम आणि नारायण (तुकारामांचा मुलगा) हे विठ्ठल दर्शनाला जात असत. आज त्याच परंपरेने लाखो वारकरी/वैष्णव आळंदी पासून उन्हा पावसाची तमा न बाळगता दिंड्या पताका घेऊन शिस्तबद्ध पद्धतीने चालत पंढरपूरला जातात. ही वारी हे जगातले एक अद्वितीय आश्चर्य आणि महाराष्ट्राचे सांस्कृतिक ऐश्वर्य आहे. अनेक ठिकाणचे, अनेक पंथाचे, अबाल वृध्द्व एकाच अध्यात्मिक शक्तिने ह्या वारीमध्ये सहभागी होतात. संतांना अपेक्षित असलेली समानता इथे आहे. वारकरी प्रत्येकामध्ये परमेश्वर पाहतात, एकमेकांना माऊली म्हणून हाका मारतात. ही मानवता आहे. माणूस म्हणून एकमेकांना जवळ आणण्याची क्षमता वारी मध्ये आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे विठ्ठलावरची/परमेश्वरावरची नितांत श्रध्दा आणि त्यायोगे सकारात्मक विचारांची मानसिकता होय. विश्व कल्याणाची तळमळ असणाऱ्या ज्ञानदेवांनी ह्याच हेतूने हा पायंडा सुरु केला असावा असे समजले तर योग्यच होईल.
 
त्या निमित्ताने ही संत संगती आपण संत शिरोमणी ज्ञानदेवांच्या कीर्तनाने (जे कीर्ती सांगते ते कीर्तन) सुरु करुया.
 
ज्ञानदेवांची थोरवी सांगताना नामदेव म्हणतात-

ज्ञानराज माझी योग्यांची माउली ।। जेणे निगमवल्ली प्रगट केली ।।
गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ।। ब्रम्हानंद लहरी प्रगट केली ||

 
ज्ञानेश्वरांनी निगमवल्ली प्रगट केली ह्या एका वाक्यात त्यांचा सार्थ गौरव केला आहे. निगम म्हणजे 'वेद'. हे जगातील प्राचीनतम वाङ्गमय आहे. हे खरोखरी ज्ञानाचे भांडार आहे. ह्या मध्ये विश्वाचे मूळ स्वरुप, देवता, यज्ञ, मानवाचे सत्य स्वरूप इतिहास, भूगोल, वेगवेगळी शास्त्रे असे अनेक विषय आहेत. अशा अनेक प्रकारच्या शास्त्र शुद्ध ज्ञानाचा हा विशाल खजिना ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद अशा चार वेदांमध्ये विस्तारीत केलेला आहे. आणि अशा ह्या निगमाची, वेदांची वल्ली म्हणजे वेल ज्ञानदेवांनी प्रगट केली म्हणजे, आपल्याला त्याचे स्वरूप सांगितले.
 
ज्ञानेश्वर महाराजांचे वडील विठ्ठलपंत हे अतिशय वैराग्यशाली, धर्म परायण हरिभक्त होते.

नित्य हरिकथा नाम संकीर्तन संतांचे दर्शन सर्वकाळ ।।

असा त्यांचा दिनक्रम होता. प्रापंचिक संसारात त्यांचे मन अजिबात रमत नव्हते. म्हणून विरक्तीच्या भावनेने त्यांनी संन्यास घेतला होता. परंतु गुरु आज्ञेने ते संन्यासाश्रमातून गृहस्थाश्रमात परत आले. ही गोष्ट त्या कालातील जन रूढींच्या विरुद्ध होती. त्यांचे आप्त, स्नेही सुद्धा त्यांची उपेक्षा करु लागले. त्या काळात ते जन नींदेचा विषय झाले होते. सर्व लोकांनी त्यांना वाळीत टाकले. अतिशय विपन्न अवस्थेत हे पति पत्नी गावाच्या बाहेर राहू लागले.
 
परंतु ह्या कालावधीत विठ्ठलपंतांनी एकाग्रतेने वेद वाङ्गमय, धार्मिक ग्रंथ, संत चरित्रांचे भरपूर वाचन केले. आणि हीच त्यांची साधना त्यांच्या चारही ज्ञानजन्य मुलांच्या ज्ञानार्जनाचा ज्ञानसागर झाली. ह्या पारमार्थिक तपाच्या अखेरीस त्यांना निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपानदेव आणि मुक्ताबाई ही चार अपत्ये झाली.
 
शालिवाहन शके अकराशे नव्वद । निवृत्ति आनन्द प्रगटले
त्र्याणवाच्या साली ज्ञानेश्वर प्रगटले I सोपान देखिले शाणणवात
नव्याणवाच्या साली मुक्ताबाई देखीली I जनी म्हणे केली मात त्यांनी (संत जनाबाई अभंग २७७)


जनाबाईंनी ह्या भावंडांचा जन्मकाल त्यांच्या अभंगामध्ये असा सांगितला आहे.
 
बाह्य परिस्थिती प्रतिकूल असताना चारही मुलांवर विठ्ठलपंतांनी अतिशय उत्तम संस्कार केले होते. सहानुभूति शून्य वातावरणात ह्या भावंडांनीही उत्तम प्रकारे विद्याभ्यास केला. परंतु समाज ह्या निष्पाप मुलांचे दर्शन सुध्दा अपशकुन समजत असे. ह्या मुलांचे उपनयन संस्कार करण्यासाठी देखील कोणी तयार नव्हते.
 
आपल्या मुलांच्या हाल अपेष्टा बघून आणि त्यांच्या भविष्याच्या काळजीने विठ्ठलपंत चिंतेत होते. ह्या असाह्य परिस्थितीतून काही तरी मार्ग काढण्यासाठी त्यांनी ब्रह्मवृन्दाची सभा बोलवली आणि क्षमा प्रार्थना केली. त्याचा तोडगा म्हणून त्या निर्दयी भावना शून्य लोकांनी त्यांना देहान्त प्रायश्चित्त सांगितले; आणि मुलांच्या कल्याणासाठी विठ्ठलपंतांनी ते स्वीकारले. अगदी लहान वयात ह्या मुलांचे आई-वडिलांचे छत्रच हरवले. तरीही ह्या मुलांच्या भविष्याचा प्रश्न सुटला नव्हता. म्हणून निवृत्तीनाथांनी तोच प्रश्न विचारल्यावर लोकांनी त्यांना परत पैठणला जाऊन तेथील ब्रह्मवृन्दाचा निर्णय आणायला सांगितला.
 
हे चौघे जण पैठणला गेले. तेथे सभा बोलावली असताना स्वतःला विद्वान समजणारे काही लोक ह्यांची टिंगल करीत होते. “ह्या गावात ‘ग्याना’ नावाचा एक रेडा पण आहे. नाव ज्ञाना/ग्याना असले म्हणून काय कोणी ज्ञानी होतो का?” असे त्या निर्बुद्धांनी म्हणताच ज्ञानेश्वर अतिशय नम्रपणे म्हणाले की तुम्ही म्हणता ते खरे आहे. “बोलवा त्या रेड्याला. त्या रेड्याचा आणि माझा आत्मा एकच आहे. मी ऋग्वेदातील ज्या ऋचा म्हणेन त्याच ऋचा तो रेडा म्हणेल”. ज्ञानदेवांनी ज्या ऋचा म्हणल्या त्याच ऋचा रेडयाने म्हणल्या आणि सभेमधील उपस्थितांना, सर्व पैठणकरांना ह्या भावंडांचे सामर्थ्य समजले. ह्या योगी, ज्ञानी मुलांना प्रायश्चित्त काय आणि कशा करिता द्यायचे असाच विचार ब्रह्मवृन्दानी केला आणि त्यांचे सन्मानाने स्वागत केले आणि त्यांना शुद्धिपत्र दिले.
 
हे परलोकीचे तारूदेवत्रय यासी । प्रायश्चित्त काय यासी द्यावे कोणी ।।
 

असा आशय नामदेवांनी दिला आहे.
 
वेद व्याख्यान, हरि कीर्तन, पुराण कथन करणे असा ह्या चारही जणांचा दिनक्रम सुरु असे. म्हाळसापूर, नेवासे येथे एका मुक्कामात शके १२१२ मध्ये ज्ञानदेवांनी श्रीमद्भगवत गीतेवरील टीका सांगितली आणि ती ‘ज्ञानेश्वरी’ ग्रंथ लिखित प्रत तयार झाली. श्रीमद् भगवतगीता ही अध्यात्म आणि तत्वज्ञानाचे सर्वोत्तम सार आहे. हीच्या वाचनाने जीवन कसे जगावे ह्याचे मार्गदर्शन होते. ज्ञान प्राप्तीने समाधान मिळते, आनन्द मिळतो म्हणून गीतेला ‘योगोपनिषद’ असे म्हणले जाते. परंतु संस्कृत भाषेमधील हे शास्त्र, काव्य, विद्या, संवाद सर्व सामान्य माणसांनाही वाचता यावे व सहज पणे समजून त्याचा लाभ व्हावा ह्या हेतूने ज्ञानदेवांनी सुमारे ९००० ओव्यांचा ‘ज्ञानेश्वरी’ हा ग्रंथ लिहिला.
 
ज्या समाजाने अपमानास्पद वागणूक दिली, ज्या समाजाच्या अवहेलनेने आई वडिलांनी देहत्याग केला त्याच समाजासाठी हे लेखन करताना ज्ञानदेवांचा उदात्त हेतू आणि निर्मल मन प्रतिबिंबित होते. ज्ञानेश्वरी मध्ये भक्ती रस आहे, अद्वैत अनुभूती आहे आणि अज्ञान नाहीसे होऊन परमानंद प्राप्ती हे प्रयोजन आहे. हे सखोल विचारांचे, भावनांचे भांडार आहे असे नामदेव म्हणतात.
 
नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवावी ।।
 
ज्ञानेश्वरी व्यतिरिक्त ज्ञानदेवांनी इतरही लेखन केले आहे. गुरु निवृत्तीनाथांच्या आज्ञे वरुन ‘अमृतानुभव’ हा ग्रंथ सुद्धा लिहिला. अमृतानुभव ग्रंथामध्ये जीव आणि परब्रह्म ऐक्याचे शुद्ध तत्वज्ञान सांगितले आहे. नामपाठासाठी हरी पाठाचे अभंग आणि इतरही अनेक अभंग लिहिले आहेत.
 
ज्ञानदेवांनी रेड्याच्या मुखातून वेद वदवले तेंव्हा ही अद्भुत घटना सर्वदूर पसरली होती. त्या काळात चांगदेव महाराज प्रसिद्ध होते. योग बळाने १४०० वर्षे आयुष्य लाभलेल्या चांगदेवांच्या कानावर ही बातमी गेली. तेंव्हा ह्या महान विभूतीला भेटावे असे त्यांच्या मनात आले. भेटी पूर्वी आपण येत असल्याचे कळवण्यासाठी त्यांनी ज्ञानदेवांना पत्र लिहिले. ते आपल्यापेक्षा वयाने लहान आहेत तेंव्हा पत्राची सुरवात नमस्कार का आशीर्वाद उल्लेखाने करावी ह्या संभ्रमात त्यांनी पत्र कोरेच पाठवले.
 
त्या पत्राच्या उत्तरासाठी ज्ञानदेवांनी जे ६५ ओव्यांचे अहंकार नष्ट करणारे लेखन केले. ते लेखन ‘चांगदेव पासष्ठी’ नावाने प्रसिद्ध आहे. चांगदेवा तुझ्या माझ्यातील एकत्वाची स्थिती ह्या पत्रा मध्ये लिहिली आहे. तिच्या साहाय्याने तू आत्मस्वरूप जाणून घे आणि मी ब्रह्मस्वरूप आहे ह्या बोधाने तू आनंदात राहा असा आशय त्या मध्ये आहे. चांगदेव वाघावर बसून, हातात सापाचा चाबूक घेऊन ज्ञानदेवांना भेटायला आले. तेंव्हा ज्ञानदेव त्यांच्या भावंडांसमवेत एका भिंतीवर बसले होते. चांगदेव समोर दिसताच ज्ञानदेवांनी ती निर्जीव भिंत चालवत त्यांच्या दिशेने नेली. हे पाहून चांगदेवांचा सर्व अहंकार संपला आणि ते ज्ञानदेवांना शरण आले.
 
ज्ञानदेवांचे मराठी भाषेवर खूप प्रेम होते.
माझा मराठीचि बोलू कौतुके परि अमृतातेहि पैजांसी जिंके I ऐसी अक्षरे रसिके मेळवीन ।। (ज्ञान. . -ओवी १४),
अमृतालाही पैजेनी जिंकणारी अक्षरे, असे म्हणत त्यांनी मराठी भाषेविषयीचा अभिमान व मराठीची महती व्यक्त केली आहे.
 
ज्ञानदेवांच्या भाषेत अलौकीक सौंदर्य आहे. उदात्त विचार आणि अध्यात्मिक एकतेचे बीज आहे. त्यांचे सर्व वाङ्गमय हे अक्षर वाङ्गमय आहे. म्हणजे अनंत काळासाठी मौलिक आहे.
ज्ञानदेवांनी सर्वतोपरी समाज हितासाठी प्रबोधन केले आहे. त्या यादव काळामध्ये अनेक धर्मपंथ होते. शिवाची उपासना करणारे ‘शैव’, विष्णूची उपासना करणारे ‘वैष्णव’, देवीची उपासना करणारे ‘शाक्त’ आणि इतरही अनेक पंथ होते. आणि प्रत्येक पंथाचे लोक एकमेकांना विरोध करत संघर्ष करीत होते. तेंव्हा ज्ञानेश्वरांनी "हरिहर" ऐक्याची संकल्पना सांगून ही एकाच परमेश्वराची रूपे आहेत हे पटवून दिले. आणि संघर्ष नाहीसा केला. तसेच, स्त्रिया आणि शूद्रांना फारच बंधन कारक वागणूक दिली जात होती. ज्ञानदेवांनी ह्या विषमता वादाला विरोध केला. सर्व स्तरातील स्त्री पुरुषांना भक्तिचा अधिकार आहे हे सांगून अध्यात्मिक न्याय मिळवून दिला आणि साधी सोपी उपासना सांगितली. आज पंढरपूर वारी मध्ये सर्व पंथातील स्त्री-पुरुष तीच साधी सोपी उपासना मनापासून करतात. एकादशीला प्रत्यक्ष मंदिरात जाणे जमले नाही तरी ‘कळस दर्शनात’ विठ्ठल दर्शनाचा आनंद मानतात. निकोप सामाजिक एकतेसाठी ज्ञानदेवांचे हे मोठे योगदान आहे.
 
ह्या सर्व कार्या नंतर आपले इहलोकीचे कार्य पूर्ण झाले असे वाटून ज्ञानदेव पंढरपूरला गेले आणि श्री विठ्ठलाकडे समाधी घेण्याची परवानगी मागितली. त्यांच्या ह्या निर्णयाने सर्वांना अतीव दुःख झाले.
 
 ज्ञानेश्वर आळंदीला आले. इंद्रायणी नदीच्या काठी, सिद्धेश्वर मंदिरा समोर समाधी स्थान निश्चित केले आणि समाधी घेण्यापूर्वी त्यांनी अतिशय निश्चल वृत्तीने १०९ ओव्यांची श्री भगवंताची स्तुती केली. वयाच्या २१ व्या वर्षी कार्तिक वद्य त्रयोदशीला ह्या ज्ञानेश्वर माउलींनी संजीवन समाधी घेतली. आजही तेथे त्यांच्या शुद्ध सात्विक अध्यात्मिक भक्ती-भावनेची अनुभूती येते.
 
दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्ये पाहो । जो जे वांछील तो ते लाहो I प्राणिजात ||
 
विश्व कल्याणाचे असे पसायदान मागणाऱ्या ज्ञानेश्वरांना सर्व भक्त प्रेमाने माउली म्हणतात. आपणही त्यांना वंदन करुया. ह्या आषाढी एकादशीला ज्ञानेश्वर माउलींच्या अनुभवातील वैचारिक वारी ने संत संगतीचा आनंद घेऊया.
 
 तपेवीण दैवत दिधल्यावीण प्राप्त गुजेवीण हित कोण सांगे । ज्ञानदेव मार्ग दृष्टांताचि मात साधूचे संगती तरुणोपाय ।।( हरिपाठ -/}
 

 

 

Copyright © *|CURRENT_YEAR|* *|LIST:COMPANY|*, All rights reserved.
*|IFNOT:ARCHIVE_PAGE|* *|LIST:DESCRIPTION|*

Our mailing address is:
*|HTML:LIST_ADDRESS_HTML|* *|END:IF|*

Want to change how you receive these emails?
You can update your preferences or unsubscribe from this list.

*|IF:REWARDS|* *|HTML:REWARDS|* *|END:IF|*

SGYP Blog: संत संगती

*|MC:SUBJECT|*
View this email in your browser

 संत संगती

- सौ जयश्री काजरेकर

 

जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्‍टविती उपकारे ।। - संत तुकाराम
 
अशी समाज कल्याणाची मानसिकता असणाऱ्या संतांची अनेक वर्षांची परंपरा हे भारत भूमीचे भाग्य आहे. परमार्थ मार्गावरील वाट दाखवणारे ते दीपस्तंभ आहेत. त्यांनी त्यांचे सगळेच कार्य कारुण्यमयी भावनेने केले आणि आधुनिक संत करित आहेत.  इतिहासाच्या नोंदी प्रमाणे १२ व्या शतकाच्या आरंभापासून सुरु झालेले हे संतांचे प्रबोधन आज २१ व्या शतकात कसे उपयोगी पडेल, असा विचार मनात येऊ शकतो.  ह्या संत संगतीचे महत्व आज आहे का?

जगाच्या पाठीवरील प्रत्येक व्यक्तिची त्या त्या व्यक्तिच्या कल्पनेप्रमाणे आनंद, किंवा विशिष्ठ गोष्ट- यश, पैसा, नावलौकिक, असे काहीतरी मिळवण्यासाठी सतत धडपड सुरु असते. आपल्याला हवी असलेली गोष्ट साध्य करण्याच्या ह्या प्रयत्नामध्ये / प्रवासामध्ये न पडता धड पणे जाण्याचा मार्ग संत दाखवतात.  त्यांच्या मते  ‘धर्म’ हा कोणत्या विशिष्ठ समुदायाला संबोधन करित नाही. त्या समुदायाची जी निती तत्वे ,सदाचरण  प्रेरणा, धारणा असते तोच त्यांचा धर्म असतो.

तसेच वर्ण/ जाती (ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, क्षुद्र) ह्या आपल्या जन्माने मिळत नाहीत, तर आपल्या कामातील कौशल्या प्रमाणे मिळतात. चातुर्वर्ण्यं मया सृष्टयं गुणकर्म विभागशः । (भगवद्गीता  अ ४--१३)

हे चार वर्ण हे मानवाच्या गुण आणि कर्म यांच्या विभागाने श्रीकृष्णांनी केले आहेत.  म्हणजेच आपण जे काम करतो तो आपला खरा वर्ण असतो. असे धर्म-वर्णा विषयी व्यापक विचार आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्या एकाच परब्रह्माचा अंश आपल्या प्रत्येकामध्ये आहे असे संत सांगतात - ही शिकवण अनंत काला साठी उपयोगी आहे.

संतांनी स्वतः अध्यात्म जाणून जो आनंद मिळवला, जे समाधान मिळवले, ते अनुभव त्यांनी नमूद केले. अक्षर वाङ्गमय तयार केले. त्यांच्या चरित्र कथांचे वाचन, मनन, चिंतन सत्संग ,श्रवण, जे जे शक्य होईल ते ते करित ही संत संगती आपल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे देत आली आहे. सद्य स्तिथीमध्यें आपण सगळे करोनाच्या वैश्विक संकटाने  चिंता ग्रस्त झालो आहोत. ह्या संसर्गाच्या प्रतिबंधासाठी ,औषध उपाययोजने साठी शास्त्रज्ञ प्रयत्न करित आहेत. आपणही काळजी करण्यापेक्षा  स्वतःची आणि इतरांची काळजी घेणे आवश्यक आहे. ह्या पूर्वीही जेंव्हा अशा प्रकारे विषाणू संसर्ग किंवा साथीने हाहाकार माजवला होता त्या परिस्थितीतून बाहेर पडून जीवन पूर्ववत सुरु झाले होते. तोच विश्वास मनात ठेऊन आणि मानवतेची ,दया बुद्धीची , संकटावर विवेकाने मात  करण्याची संतांची शिकवण आपण आमलात आणूया. 

येत्या १ जुलै ,आषाढी एकादशी पासून दर महिन्याच्या शुद्ध एकादशीला आपण एकेका संतांची महती थोडक्यात जाणण्याचा प्रयत्न करुया. संतांचे विचार हे अनंत कालासाठी उपयोगी आहे. त्यांचे कार्य आणि अक्षर वाङ्गमय असे एका लिखाणात सामावणे केवळ अशक्य आहे. तरीही त्या निमित्ताने आपण त्यांचे चरित्र, कथा, शिकवण समजून घेऊ आणि आजच्या काळात कसे उपयोगी पडेल ते ठरवू. हीच आपली ‘संत-संगती’. चला तर मग आपणही देवाकडे तेच दान मागुया जे संत तुकारामांनी मागितले-

हेचिं दान देगा देवा तुझा विसर व्हावा ।।
गुण गाईन आवडी हेचिं माझी सर्व जोडी ।।
लागे मुक्ति आणि संपदा संत संग देई सदा


 ह्या वर्षी  `आषाढी वारी -पालखी सोहळा दरवर्षीं प्रमाणे होऊ शकत नाही.पण आपण तो भक्ती भाव मनात जपून ह्या वैचारिक वारीत सामील होऊया.
 
 

 

Copyright © *|CURRENT_YEAR|* *|LIST:COMPANY|*, All rights reserved.
*|IFNOT:ARCHIVE_PAGE|* *|LIST:DESCRIPTION|*

Our mailing address is:
*|HTML:LIST_ADDRESS_HTML|* *|END:IF|*

Want to change how you receive these emails?
You can update your preferences or unsubscribe from this list.

*|IF:REWARDS|* *|HTML:REWARDS|* *|END:IF|*

SGYP Blog: अक्षय तृतीया

*|MC:SUBJECT|*
View this email in your browser
SGYP Blog : अक्षय तृतीया

अक्षय तृतीया

 -- सौ. जयश्री काजरेकर

वैशाख शुक्ल तृतीया हा दिवस साडे तीन मुहूर्तातील एक शुभ मुहुर्त आहे. अक्षय तृतीयेला कृत युग संपून त्रेता युग सुरु झाले. कालविभागाच्या या प्रारंभ दिवसाला ‘युगादी' असे संबोधले जाते. 'युगादी' आणि 'कल्पादी ' म्हणजे ब्रह्म देवाच्या दिवसाचा प्रारंभ ह्याच तिथीला झाला आहे. ह्या दिवशी सुरु केलेल्या कर्माचे फल अक्षय (अविनाशी ) असते.

नॉर्थ अमेरिकन पंचांगा प्रमाणे शनिवार दिनांक २५ एप्रिल ला अक्षय तृतीया आहे.

श्री गणेशाने, व्यास मुनींनी सांगितलेले महाकाव्य महाभारत लिहायला अक्षय तृतीयेला सुरवात केली म्हणून सर्व शुभ कार्याची सुरवात ह्या दिवशी केली जाते. हयग्रीव व परशुराम अवतार या दिवशी प्रकट झाले. तसेच लिंगायत पंथाचे संस्थापक श्री बसवेश्वर ह्यांचा हा जन्म दिवस आहे. चैत्र शुद्ध तृतीयेपासुन सुरु झालेल्या चैत्र गौरी उत्सवाची याच दिवशी सांगता होते. पूर्वी स्वयंपाकघर, माजघर ह्या पलीकडील जगात एरवी फारसा वावर नसण्याऱ्या सुवासिनींना शालू, पैठण्या नेसून अलंकार घालून केसांमध्ये सुवासिक फुले माळुन “चैत्र-गौरीचे हळदीकुंकू” समारंभाला जाण्याचे हे निमित्त ह्या वासंतिक उत्सवामध्ये असे.

 ह्या शुभ-मुहूर्तावर किंमती वस्तू, विशेषतः सोने खरेदी करण्याची माहिती सर्वांना आहे.

धार्मिक रुढी प्रमाणे ह्या दिवशी गंगा/समुद्र/तीर्थ स्नानाचे महत्व आहे. आरोग्य, सुख-समृद्धी प्राप्त करुन देण्याऱ्या देवतेची श्रद्धापूर्वक उपासना केली जाते. भारतातील बद्रीधाम येथील बद्रीनारायणाच्या मंदिरात सहा महिन्या नंतर ह्या दिवशी प्रवेश मिळतो. तसेच अयोध्ये जवळच्या कुंजबिहारी श्रीकृष्ण मंदिराचे दरवाजे ह्याच दिवशी उघडतात. वृंदावन च्या श्री बांकेबिहारींच्या मंदिरात फक्त ह्याच दिवशी श्री विग्रहाचे चरण दर्शन होते.

श्री विष्णू सहित वैभव लक्ष्मीचे पूजन करण्याचे विशेष महत्व आहे. श्री कृष्ण मूर्तिला चंदनाची उटी लावली जाते. परशुराम- सप्त चिरंजीवापैकी एक आहेत त्यांना अर्घ्य दिला जातो. विष्णु पूजन, श्रीकृष्ण भगवानाला चंदन लेपन, हवन, तर्पण आणि दान करताना चित्त वृत्ती अगदी शुद्ध ठेऊन सद्भाव मनात ठेवावा. देवता आणि पूर्वजांसाठी आपण काही अर्पण करतो असे समजण्यापेक्षा त्या रूपाने भगवंतासाठी कृतज्ञतेचा, शरणागतीचा भाव मनामध्ये आणावा.

हा दिवस अधिकतर प्रमाणात कृतज्ञता दिवस म्हणणे योग्य होईल. देवता व पितरांना तीळ-तर्पण अर्पिले जाते. तसेच ज्या भूमीमधून अव्याहत पणे वनस्पती उगवत असतात त्या बद्दल ही कृतज्ञता व्यक्त केली जाते. नवीन औषधी वनस्पतींची आणि इतरही वनस्पतींची लागवड-पेरणी केली जाते. ह्या शुभ दिवशी पेरणी केलेल्या वनस्पती चांगल्या फुला-फळांनी बहरतात असा अनुभव आहे.

राम जन्माचे सुंदर वर्णन करताना कवीवर्य ग. दि.माडगूळकरांनी असे म्हंटले आहे कि-
 "चैत्र मास, त्यात शुद्ध नवमी ही तिथी I गंध युक्त तरिही वात उष्ण हे किती II"

ह्या शब्द पंक्तींमध्ये चैत्र-वैशाख महिन्याच्या उष्ण वात म्हणजेच उष्णतेच्या काहिलीची जाणीव प्रकट केलेली आहे. ह्या उन्हाळ्याचा त्रास कमी होण्यासाठीच जणु अक्षय तृतीयेला पाणपोई सुरु करणे, छत्री, चपला, पंखा, चंदन ह्या गोष्टींचे दान करणे पुण्यकारक मानले आहे. उदककुंभाचे वाळा मिश्रित पाण्याच्या घड्याचे दान करण्याची ही एक प्रथा आहे.

वास्तविक पाहता गेले काही महिने आपण सर्वजण 'करोना' संसर्गाच्या काळजीने व्यथित आहोत. त्यामुळे सण, उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरे करणे समारंभासाठी एकत्र जमणे ह्या गोष्टी अशक्य आहेत. परंतु ह्या दिवसाचे सांस्कृतिक महत्व जाणून घेणे, परंपरांची उजळणी करणे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ह्या माहितीच्या अनुषंगाने सद्यस्थिती मध्ये काहीतरी अक्षय पुण्य कर्म करणे उचित होऊ शकेल.

युगादी आणि कल्पादी कालखंडची सुरवात झालेल्या ह्या मंगल दिवसापासून करोना संसर्गाचा प्रादूर्भाव आता लवकर नियंत्रित होण्यासाठी आपण परमेश्वराची प्रार्थना करुया . आपण ज्या कृतज्ञतेच्या भावनेने पितरांचे स्मरण करतो, दान धर्म करतो तश्याच उदात्त भावनेने आज ह्या संसर्गामुळे जे अडचणीत आलेले अर्थार्थी आहेत त्यांना सहाय्य करु शकतो.

ज्या गंगा- तीर्थ स्नानाचे, अर्घ्याचे विशेष महत्व आहे ते मनामध्ये स्मरण करुन वैयक्तिक स्वछतेचे पालन आणि सामाजिक संपर्क, नियमानुसार आणि नियंत्रित करु शकतो. ज्या भूमीतून धान्य, फळे-फुले, वनौषधी आणि बऱ्याच जीवन उपयोगी गोष्टी मिळतात त्या भूमीचे, पर्यावरणाचे, जलाशयांचे प्रदूषण कमी होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यासाठी अक्षय कार्यशील राहण्याचा निश्चय करु शकतो. अक्षय तृतीयेला किंमती वस्तू खरेदी करण्याची प्रथा आपण सोन्यासारखी माणूसकी जपण्याच्या प्रथेत परिवर्तित करु शकतो. थोडक्यात सनातन दाखले, प्रथा आणि सद्य परिस्थिती ह्यांची एकत्र सांगड घालून अक्षय तृतीया साजरी करुया.

भगवान श्रीकृष्णांनी युधिष्टिराला सांगितले होते की
"अक्षय तृतीयेला केलेले दान आणि हवन कधीही क्षयाला जात नाही. देव आणि पूर्वज यांना

उद्देशून केलेले कर्म अक्षय म्हणजे अविनाशी होते आणि दान पुण्यकारक होते."

हे दान सत्पात्री असावे. सत्कार्यासाठी झटणाऱ्या संस्था, गरजू व्यक्ति, धर्म प्रसार करण्याऱ्या संस्थांना केलेले दान श्रेष्ठ होय.
 
श्री गणेश याग परिवाराच्या संकेत स्थळावर अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर देणगी रुपाने दान देण्याचा संकल्प पूर्ण होऊ शकेल.

http://www.sgypariwar.com/donate/

श्री गणेश याग परिवारातर्फे सर्वांना सुरक्षित आरोग्यासाठी आणि अक्षय सुख समृद्धी साठी हार्दिक शुभेच्छा!
 

Copyright © *|CURRENT_YEAR|* *|LIST:COMPANY|*, All rights reserved.
*|IFNOT:ARCHIVE_PAGE|* *|LIST:DESCRIPTION|*

Our mailing address is:
*|HTML:LIST_ADDRESS_HTML|* *|END:IF|*

Want to change how you receive these emails?
You can update your preferences or unsubscribe from this list.

*|IF:REWARDS|* *|HTML:REWARDS|* *|END:IF|*

SGYP Blog: गुढी उभारु आरोग्याची

*|MC:SUBJECT|*
View this email in your browser
Click to Play above VIDEO
समर्थ रामदासांच्या उपास्य देवतेचे ‘श्रीरामाचे’ रामरक्षा स्तोत्र हे एक आरोग्य कवच आहे. 

गुढी उभारु आरोग्याची

- सौ जयश्री काजरेकर


आपले नववर्ष, आपला गुढी पाडवा २४ मार्च २०२० रोजी, मंगळवारी (नॉर्थ अमेरिकन पंचांगा प्रमाणे) सुरु होत आहे. ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केलेला हा दिवस म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिपदा. ह्या वर्षी साठ संवत्सरांपैकी ‘शार्वरी’ संवत्सर सुरु होत आहे.

पारंपरिक पद्धतीने सूर्योदयापूर्वी गुढी उभारून पूजा करावी. देव पूजा, पंचांग पूजा करुन नव्या वर्षात करावयाच्या चांगल्या कामांचा संकल्प करावा. कुटुंबियां समवेत मिष्टान्न भोज करुन दिवस आनंदात घालवावा. आपल्याकडे प्रत्येक सणाला काही विशिष्ठ पदार्थ सेवन करण्याची परंपरा आहे. गुढी पाडव्याला कडूनिंबाच्या कोवळ्या पानांचे आणि फुलांचे मिरे, मीठ, ओवा घालून केलेल्या चूर्णाचे सेवन कले जाते. त्यामुळे रोगमुक्ती होते आणि आपले आरोग्य संवर्धन होते असे म्हणतात. ह्या वर्षी आपण आरोग्याची गुढी उभारुन हा सण साजरा करुया.
ह्या दिवसाचे विशेष म्हणजे प्रभू श्रीरामचंद्रांनी रावणासह अनेक राक्षसांचा पराभव करुन ते अयोध्येत आले. शालिवाहनाने ह्या दिवशी शत्रूवर दैदीप्य विजय मिळवला. आदिशक्तिने ‘नव दुर्गांच्या’ रुपाने दुष्टांचा, दुष्ट-शक्तिंचा नायनाट केला.

२०२० इंग्रजी वर्षाची सुरुवात ‘करोना‘ विषाणूच्या काळजीयुक्त बातमीने झाली. प्रथम चीन देशातील वूहान शहरात उद्भवलेल्या आणि पाठोपाठ अतिशय वेगाने जगभरातील असंख्य लोकांचे आरोग्य धोक्यात आणून युद्धजन्य परिस्थिती निर्माण करणाऱ्या ह्या विषाणूचे गांभीर्य वाढले आहे.

सध्या व्हाट्सअप, ईमेल किंवा सर्वच सोशल मिडीयावर करोना विषयक बातम्या आणि प्रतिबंधात्मक उपायांचा अक्षरशः पाऊस पडतोय. खरे तर फार पूर्वी पासून आपल्याकडं चांगल्या गोष्टी शिकवलेल्या आहेत. उदाहरणार्थ. - बाहेरुन आल्यावर आणि दिवसभरात आवश्यक असेल तेंव्हा हात साबणानें स्वच्छ धुवावेत, चप्पल -बूट प्रवेशद्वारा जवळ काढून हात पाय धुणे, दररोज सकाळी स्नान करणे, पूजा-अर्चना करणे, संध्याकाळी देवापुढे सांजवात लावून ‘शुभम करोति कल्याणम, आरोग्यम धनसंपदाम’ अशी कल्याणकारी प्रार्थना करणे, संध्या करताना प्राणायाम करणे हात जोडून नमस्कार करुन अभिवादन करणे, घरी बनवलेले/ शिजवलेले अन्न सेवन करणे, नैवेद्याच्या ताटामध्ये आणि एरवीही जेवणात लिंबाची फोड ठेवणे, कोशिंबीर- भाज्या अशा चौरस आहाराचा समावेश असणे, हे आणि असे बरेच काही शिकलेले/ऐकलेले आज परत फिरुन आरोग्यासाठी नव्याने सांगितले जाते आहे.

हा ‘करोना‘ एक ‘झुनॉटिक’ विषाणू , प्राण्यांच्या शरीरातून मानवी शरीरात आल्याने मानवी शरीराला ही प्रतिकार लढाई अवघड होत आहे. संशोधक अथक प्रयत्न करुन त्यावर औषध शोधत आहेत. प्रत्येक देश जनतेच्या सुरक्षिततेसाठी वेगवेगळ्या उपाय-योजना करित आहे. राष्ट्रीय स्तरावर ह्या विषाणूच्या प्रतिबंधासाठी प्रयत्न सुरु आहेत. आपणही पाडवाच्या ह्या दिवसाचे औचित्य साधून करोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी प्रयत्न करुया.

समर्थ रामदासांच्या उपास्य देवतेचे ‘श्रीरामाचे’ रामरक्षा स्तोत्र हे एक आरोग्य कवच आहे. त्यात शरीराच्या प्रत्येक भागाच्या रक्षण करण्यासाठी रामाला विनंती आहे.

अठराव्या शतकामध्ये प्रत्यक्ष घडलेली एक घटना आहे. चातुर्मास सुरु होता आणि समर्थ रामदासांचे अनेक शिष्य सातारा जिह्ल्यामधील तारळ खोऱ्यामध्ये थंडीतापाच्या साथीने आजारी पडले. कल्याण स्वामींनी हे रामदास स्वामींना सांगितल्यावर समर्थांनी साथीच्या रोगापासून कष्ट निवारण होण्यासाठी तुरंत एक श्लोक लिहीला. असा उल्लेख ‘दासविश्राम धाम (५६-५१ ) ह्या ग्रंथामध्ये आहे.

इंद्रनीळ रंग राम श्याम धाम योगियां नाम पूर्ण काम सार फार भवरोगियां ।।

वाग्देवता मंदिरातील कल्याण स्वामींच्या लेखनातील ओव्या (२६०-२६१ ) मध्ये सुद्धा हा श्लोक आढळतो. आपण श्रद्धेने ह्या श्लोकाचा जप करुन सध्याच्या परिसस्थितीत आरोग्य प्राप्तीचा अनुभव घेऊया.
सर्व सृष्टी मधील प्राणी मात्रांच्या आरोग्यासाठी अजून एक श्लोक देत आहे.


भद्रं कर्णेभि: शृणुयाम देवा | भद्रं पश्येमाक्षभिर्य्जत्रा :|

स्थिरैरङ्गॆ स्तुष्टु वान्स स्तनु भिर्व्यशेम्
देवहितं यदायु ||

अर्थ- हे परमेश्वरा आमच्या कानांना शुभ- चांगल्या गोष्टीच ऐकू येऊ देत. आमच्या नेत्रांना चांगल्या गोष्टीच दृष्टीस पडू देत. आमचे शरीर आरोग्यपूर्ण राहून आमचे आयुष्य देवहिताच्या, मानवतेच्या कल्याणासाठी व्यतीत व्हावे अशी प्रार्थना आहे.  
प्राचीन काला प्रमाणेच आज आधुनिक कालामध्येही ॐ स्वामीजी, सद्गुरु जग्गी वासुदेवजी, श्री श्री रवी शंकरजी असे अनेक संत, महंत जनकल्याणासाठी अविरत कार्य करित आहेत. इंटरनेट, यू-ट्यूब वर ह्यांचे अनेक सुविचार उपलब्ध आहेत. मोबाईलवर ‘ब्लॅक लोटस‘ सारखे अनेक चांगले अँप उपलब्ध आहेत. त्यावर दररोज नवीन विचार, सत्संग व्हिडीओ-ऑडिओ, ध्यान धारणा, मंत्रोपासना आणि सगळ्यात महत्वाचे मानवतेच्या, भूतदयेच्या छोट्या छोट्या अनेक गोष्टी सुचवल्या आहेत. अंतर बाह्य निर्मळतेसाठी, निर्व्याज प्रेमाच्या स्वभाव धर्मासाठी जमू शकणाऱ्या ह्या साध्या सोप्या गोष्टी आहेत. ह्या उल्लेख केलेल्या गोष्टींपैकी जमेल ते नेमाने करण्याचा व सनातन धर्माच्या शिकवणीचा आपण जाणीव पूर्वक संकल्प करुया. करोना मुळे आलेले ताण आणि त्यामुळे झालेला त्रास ह्यावर मनःशांती साठी हे उपयोगी आहे. नवीन वर्षात चांगल्या कामांसाठी आवश्यक दृष्टी साठी शारीरिक आरोग्या इतकेच मानसिक आरोग्य जपणे महत्वाचे आहे.

हे विश्व, हे ब्रह्माण्ड ज्या आकाश, वायू, तेज, आप, पृथ्वी ह्या पंचमहाभूतांच्या संयोगाने बनले आहे त्याच पंचतत्वांनी आपले शरीर, असंख्य जीव-जंतू, वनस्पति ई. तयार झाल्या आहेत. त्या परमात्म्याचा सूक्ष्म, अति-सूक्ष्म अंश प्रत्येक प्राणिमात्रा मध्ये अस्तित्वात आहे. आपल्या मध्ये असलेल्या त्या शक्तीचा विचार करुन, आरोग्य वर्धनासाठी, विश्व कल्याणासाठी ह्या पाडव्याला मनापासून प्रार्थना करा. त्यामध्ये प्रचंड ऊर्जा आहे.

तसेच विघ्नहर्ता श्री गणेशाची षोडशोपचार पूजा आणि अथर्वशीर्ष आवर्तने नियमित पणे करण्याचा श्री गणेश याग परिवाराचा परिपाठ आहेच. ह्या महिन्यात हा परिपाठ तुम्हां सर्वांच्या समवेत आधुनिक तंत्र ज्ञानाच्या साहाय्याने आपण सर्वांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करणार आहोत.
 
आरोग्याची गुढी, भरजरी शेला, गाठी माला असे गुढी ही विजयाची,नव्या युगाची, नव्या मनूची गुढी उभारु आरोग्याची.
 
शुभ-मुहूर्त हा पहिला येत उधळण होते मांगल्याची,
पंचांगाची पूजा करुनी स्थिती जाणूया जगताची.
 
पंचेंद्रियांनी सतर्क राहून गुढी उभारु जागृकतेची,
आप, तेज, वायू, आकाशासह करु अर्चना अवनीची.
 
नजराणा मोलाचा हा, ही किमया पंचतत्त्वांची,
भरण पोषण करण्यासाठी, समर्थ समिती ह्या पाचांची.
 
विज्ञानाच्या पाठी जाता, पाठशिवणी का अज्ञानाची,
पर्यावरणा जपले असता नसे भिती त्या प्रलयांची.
 
नको मोह अति, नको लोभ, जाण असू दे तृप्तीची,
विश्वशांतीसह स्वास्थ्यासाठी गुढी उभारु आरोग्याची.
 
येणारे नवे वर्ष विषाणू संसर्ग मुक्त, आरोग्यदायी आणि संकटनिवारण संकल्प पूर्तीचे असावे हेच श्री गणेश याग परिवारातर्फे अभिष्टचिंतन.
 

Copyright © *|CURRENT_YEAR|* *|LIST:COMPANY|*, All rights reserved.
*|IFNOT:ARCHIVE_PAGE|* *|LIST:DESCRIPTION|*

Our mailing address is:
*|HTML:LIST_ADDRESS_HTML|* *|END:IF|*

Want to change how you receive these emails?
You can update your preferences or unsubscribe from this list.

*|IF:REWARDS|* *|HTML:REWARDS|* *|END:IF|*

SGYP - Blog : पंचमहाभूते आणि मानवी जीवन

पंचमहाभूते आणि मानवी जीवन

पिंडी ते ब्रह्माण्डी असे बोली भाषेत म्हणले जाते परंतु वास्तवात ब्रह्माण्डी ते पिंडी असे म्हणणे योग्य होईल. त्याचे कारण असे कि पिंड म्हणजे देह आणि ब्रह्म अर्थात शून्य. या शून्यापासुन सृष्टीची रचना झाली. ब्रह्माण्डाची निर्मिती चैत्र शुद्ध प्रतिपदा/गुढी पाडव्याच्या दिवशी ब्रह्मदेवाने केली. ह्या निर्मितीच्या प्रक्रियेत जे ब्रह्मज्ञान आहे ते जाणले तर पंचमहाभूतांचे सार्वभौमत्व आपल्याला सहज पटेल.

सृष्टीच्या निर्मितीमध्ये परमात्म्याने आपल्या आत्म्यापासून सर्व प्रथम 'जड' आणि ‘जीव’ ही दोन तत्वे तयार केली.

 तस्माद्वा एतस्मादात्मन आकाश:संभूत:। आकाशाद्वायु: । वायोरग्नि: । अग्नेराप: । अदभ्य: पृथिवी । पृथिव्या ओषधयः । औषधीभ्योअन्नम् । (उपनिषद)

आपल्या आत्म्यापासून ब्रह्मदेवाने आकाश निर्माण केले,आकाशापासून वायु, वायुपासून अग्नि, अग्नि पासून पाणी, पाण्यापासून पृथ्वी, पृथ्वी पासून औषधी वनस्पती आणि औषधी वनस्पतींपासून अन्न निर्माण केले.

जड तत्वामधुन बुद्धी आणि अहंकार तयार झाल्यावर पुढे जो विकास झाला त्यामध्ये दोन प्रकार तयार झाले. एका प्रकारात आकाश, वायु, तेज, आप (जल) आणि पृथ्वी हि पंचमहाभूते उत्पन्न झाली आणि दुसऱ्या प्रकारात मन, पाच ज्ञानेंद्रिय आणि पाच कर्मेंद्रिये उत्पन्न झाली. जेंव्हा ह्या दोन्ही शाखांचा संयोग होतो तेंव्हा शरीर तयार होते आणि पुढे ह्या शरीराचा आत्म्याशी (जीव तत्वाशी) संयोग होतो तेंव्हा प्राण्याचा जन्म होतो. अशा प्रकारे ब्रह्माण्डाच्या आणि आपल्या शरीराच्या निर्मितीमध्ये पंचमहाभूतांचे महत्व आहे.

सृजन कर्त्याने ह्या निर्मिती प्रक्रियेत अनेक प्राणी, वनस्पती, वातावरण, ग्रह, तारे अशा अनेक सजीव आणि निर्जीव गोंष्टींची पण निर्मिती केली आहे. परंतु सौर मंडला मध्ये केवळ पृथ्वी तलावावर सजीवांचे-आपले अस्तित्व आहे, हे आपले भाग्य आहे. अंतराळ संशोधना मार्फत इतर ग्रहांवर जीव सृष्टी आहे का ह्याचा शोध वैज्ञानिक घेत आहेत.

आपल्या संतांनी पंचमहाभूते आणि शरीराच्या जडण घडणीत जे साम्य आहे त्यावर सुंदर रचना केल्या आहेत. दासबोधात रामदास स्वामींनी मोठय़ा बहारदार शब्दात हे वर्णन केले आहे. स्वामी लिहितात-

जे जे जड आणि कठीण।

ते ते पृथ्वीचे लक्षण।

मृद आणि वोलेपण।

तितुके आप॥

जे जे उष्ण आणि सतेज।

ते ते जाणवे पै तेज।

आता वायोही सहज निरोपीजे॥

चैतन्य आणि चंचळ।

तो हा वायोजि केवळ।

मुख्य आकश निश्चळ।

आकाश जाणावे॥

हेच जे ब्रह्माण्डी ते पिंडी तत्व. शरीराच्या अंतर रचने मध्ये मांस, हाडे, मज्जासंस्था, जे जडत्व आहे ते पृथ्वी तत्व आहे. विविध प्रकारे स्त्रवणारे अंत:स्त्राव व रक्त हे आप तत्व आहे. शरीरातील उष्णता हे तेज तत्व आहे. शरीरात चालू असणाऱ्या प्राण, अपान, व्यान, उदान आणि सामान वायुमार्फत सुरु असणाऱ्या क्रिया, श्वासोत्सवास हे वायुतत्व आहे. शरीराच्या अंतर रचने मध्ये जिथे पोकळी आहे - कवटी, नाक, कान, जठर, रक्त वाहिन्यातील पोकळी, अन्ननलिका, आतडे ते आकाश तत्व आहे. अशा प्रकारे पंचमहाभूतात्मक संघटन काय आहे त्यावर आपली प्रकृती ठरते.

ब्रह्मदेवाने पंचमहाभूते निर्माण केली तेंव्हा ती संतुलित राहण्यासाठी प्रत्येक भूताचा अंश इतर चार ही भूतांमध्ये निर्माण केलेला आहे. उदाहरणार्थ जर प्रत्येक भुताचे सोळा गुण आहेत असे गृहित धरले तर समजा आकाश हे तत्व आहे त्याचे आठ गुण आणि उरलेल्या इतर वायु, तेज, आप आणि पृथ्वी ह्या चार महाभुतांचे प्रत्येकी दोन गुण असे एकूण आठ गुण असे एकत्रित करुन आकाश सोळा गुणांचे एक तत्व तयार केले. ह्या संतुलन अवस्थेला ‘पंचीकरण’ अशी संज्ञा आहे. पंचमहाभूतांचे हे व्यवस्थापन फार मोलाचे आहे. अन्यथा त्यांच्या अनिर्बंध प्रमाणाने पृथ्वीवरील पर्यावरणाचा ऱ्हास होऊ शकतो किंवा प्रलय होऊ शकतो. हे त्या विधात्याने जाणले होते.

आपल्या शरीरातही हीच पाच तत्वे संतुलित राहणे आरोग्याच्या दृष्टीने अत्यावश्यक आहेत हे निर्मितीच्या वेळेसच निश्चित झाले आहे. पंचमहाभूतांचे जसे संतुलित प्रमाण ठरवले आहे तशा त्यांच्या मर्यादांचे नियमन ही ठरलेले आहे.

सप्तलोक -- भू:, भुव:, सुव:,मह:, जन:, तप:, सत्यम्

सप्त पाताळ -- अतल, वितल, सुतल, तलातल, महातल, रसातल, पाताल

दहा दिशा -- चार मुख्य दिशा -पूर्व, दक्षिण, पश्चिम, उत्तर, आणि सहा उपदिशा - आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य, उर्ध्व आणि अधर

ह्या बंधनांच्या मर्यादेत पंचमहाभूतांची व्याप्ती आहे.

जसे पंचमहाभूतांना संतुलित प्रमाण आणि मर्यादा आहेत अगदी तसेच नियम मानवी शरीरातील पंचभूतांनाही लागू आहेत. आरोग्यशास्त्रानुसार सर्व साधारणपणे आपल्या शरीरात ७२% आप तत्व, १२% पृथ्वीतत्त्व, ६% वायुतत्व, ४% अग्नी तत्व आणि ६% आकाश तत्व हे संतुलित प्रमाण आहे. ह्या प्रमाणाचे संतुलन जेंव्हा बिघडते तेंव्हा आरोग्याच्या तक्रारी सुरु होतात.

शरीरामध्ये नवीन पेशी तयार होण्यासाठी पृथ्वी तत्व कार्य करत असते. अन्न पचनाचे कार्य अग्नी तत्व करत असते, रक्ताभिसरणाचे काम आप तत्व करत असते, श्वसनक्रियेसाठी वायु तत्व कार्यरत असते,आरोग्यपूर्ण मनोव्यापाराठी आकाश तत्व कार्यरत असते. शरीराचे सर्व कार्य व्यवस्थित चालू राहण्यासाठी जी शक्ती वितरण करणारी शक्तीकेंद्रे किंवा षट्चक्रे आहेत त्या ठराविक चक्रांमध्ये ठराविक तत्वांचे स्थान आहे.

मूलाधारचक्र – पृथ्वी तत्व,

स्वाधिष्ठान चक्र -- जल तत्व,

मणिपूर चक्र -- अग्नी तत्व,

अनाहत चक्र – वायु तत्व,

विशुद्धी चक्र -- आकाश तत्व

अशा प्रकारे षट्चक्रांमध्ये पंच महाभूतांची स्थाने आहेत. षट्चक्रांवर केलेल्या शास्त्रशुद्ध ध्यान धारणेचा उपयोग निरामय आरोग्यासाठी होतो हे सिध्द झालेले आहे. आपल्या शरीरात तसेच हातांच्या बोटात अग्निचे प्रतिनिधीत्व हाताचा अंगठा करतो. तर्जनी वायुचे प्रतिनिधीत्व करते. मधले बोट आकाश तत्वाचे प्रतिनिधीत्व करते. अनामिका पृथ्वी तत्वाचे प्रतिनिधीत्व करते, आणि करंगळी जल तत्वाचे प्रतिनिधीत्व करते. आपल्या सनातन शास्त्रांमध्ये पूजा-अर्चा करताना ज्या अनेक मुद्रा सांगितलेल्या आहेत त्यामागे आरोग्य विचारांचा आधार आहे. पाची बोटांचा वापर करुन जेवणाची, नैवेद्य दाखवताना केलेल्या मुद्रांची पूर्वापार चालत आलेली पद्धत शास्त्रोक्त आहे.

प्रकृतीमध्ये उत्पन्न झालेल्या तक्रारींवरुन पंचमहाभूतांचे कोणते प्रमाण असंतुलित झाले आहे ते आयुर्वेदशास्त्र आणि इतर हीलिंग थेरपी मध्ये निश्चित करतात आणि त्याप्रमाणे उपाय-योजना करतात. आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी जाणकारांनी शास्त्रामध्ये उपयुक्त माहिती दिलेली आहे. चौरस आणि शुद्ध-सात्विक आहार, नियमित व्यायाम, दीर्घ श्वसन, ध्यान-धारणा आणि सुदृढ मानसिकता हे आवश्यक आहे. त्याप्रमाणेच आपल्या आरोग्याच्या तक्रांरीसाठी आपण जितके काळजीपूर्वक लक्ष देतो तशीच काळजी पर्यावरणाच्या संवर्धनाची पण घेतली तर खरा परमार्थ होईल. प्रगत मनुष्य भौतिक सुखांच्या मागे धावत आहे. बुद्धीच्या जोरावर नवीन ग्रहांवर जीव सृष्टी आहे का हे संशोधन करण्याची जेवढी जिज्ञासा आहे तशीच प्रायोगिकता आणि प्रयत्न पर्यावरणाच्या संवर्धनासाठी करणे आवश्यक आहेत.

आज जागतिक तापमानवाढ (ग्लोबल वॉर्मिंग), पाण्याचा दुष्काळ किंवा पावसाचा अतिरेक, अनियमित बर्फवृष्टी आणि असेच निसर्ग चक्रातील बदल संपूर्ण जगात अनुभवले जात आहेत. पर्यावरणाचा समतोल राहण्यासाठी पंचमभुतांचे जे मूळ स्वरुप आणि प्रमाण होते ते बदलत गेल्याने हे दुष्परिणाम अनुभवले जात आहेत. आपण आपल्या स्वःताच्या आरोग्य वर्धनासाठी आणि पर्यावरणाच्या संतुलनासाठी सजग होणे गरजेचे आहे. अनेक पर्यावरण प्रेमी संस्था कार्य करत आहेत.  आजच्या  काळात सौर आणि नैसर्गिक ऊर्जेचा अधिकाधीक वापर, पाण्याची बचत, वृक्षारोपण, प्रदूषण नियंत्रण करता येईल.

गर्मी नंतर येणाऱ्या पावसाच्या सरी, समुद्राच्या संथ लाटांचा लयबद्ध आवाज, पूर्ण चंद्र बिंब आणि निरभ्र आकाश अशी निसर्गाची अनेक रुपे आपल्याला जी प्रसन्नता देतात तसेच आपण ही परत काही देऊ केले पाहिजे. पंचमहाभूतांचे संतुलन जपले पाहिजे आणि निसर्ग संवर्धन केले पाहिजे.

श्री गणेशयाग परिवार दरवर्षी वृक्षारोपणा सारखे उपक्रम आयोजित करत असतो त्या मध्ये सहभागी होण्यासाठी आपले सर्वांचे स्वागत आहे.

-सौ. जयश्री काजरेकर

SGYP Blog : अधिक मास - १६ मे ते १३ जून २०१८

*|MC:SUBJECT|*

II ॐ गं गणपतये नमः II

SHREE GANESH YAG PARIWAR
 
DONATE (click here)
अधिक मास - १६ मे ते १३ जून २०१८


ह्या वर्षी ज्येष्ठ अधिक मास आहे. आपले सण, उपासना, व्रते, हे चांद्र मासा प्रमाणे ठरलेली आहेत. आणि ऋतू सौर मासा प्रमाणे ठरलेले आहेत. काल गणनेचे चंद्राच्या आणि सूर्याच्या गती प्रमाणे चांद्र वर्ष आणि सौर वर्ष असे दोन प्रकार आहेत. आपल्या पूर्वजांनी  शास्त्रशुद्ध आणि अचूक पद्धतीने काल गणनेचा अभ्यास केलेला आहे.

 चंद्राला पृथ्वी भोवती परिभ्रमण करण्यासाठी एक महिना लागतो. प्रतिपदे पासून अमावस्ये पर्यंत म्हणजे साधारण पणे ३०दिवसांच्या ह्या कालावधीला "चांद्र मास" म्हणतात. ह्या मासांच्या  चांद्र वर्षाचे  ३५४ दिवस असतात. पृथ्वीला सूर्याभोवती एक परिभ्रमण करायला  लागणारा कालावधी म्हणजे "सौर वर्ष" हे वर्ष ३६५ दिवसांचे असते. दर वर्षी दोन्ही वर्षांच्या कालगणने मध्ये ११ दिवसांचा फरक पडतो. प्राचीन शास्त्रकारांनी दोन्ही वर्षातील हा फरक भरून काढण्यासाठी दर वर्षांनी (अचूकपणे सांगायचे तर ३२ महिने १५ दिवसांनी ) एक  चांद्र मास अधिक धरावा असे सांगितले आहे. आणि ह्याला पुढील चांद्र मासाचे नाव दिले जाते. ह्या वर्षी "अधिक ज्येष्ठ " मास आहे.पुढे १९ वर्षांनी परत ज्येष्ठ अधिक मास येईल. चैत्र महिन्या पासून अश्विन महिन्या पर्यंत आणि क्वचित प्रसंगी फाल्गुन महिना अधिक येतो. कारण ह्या काळात सूर्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत जायला ३० दिवसां पेक्षा कमी वेळ लागतो. ह्या अधिक तेराव्या चांद्र मासात सूर्य इतर महिन्यां प्रमाणे एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण करत नाही. म्हणून ह्या महिन्याला "मलमास" असेही म्हणतात.
तसेच ह्या महिन्याचा स्वामी, उपास्य दैवत भगवान श्रीकृष्ण --श्रीहरि नारायण ---पुरुषोत्तम आहे म्हणून ह्याला "पुरुषोत्तम "मास असेही नाव आहे. ह्या पुण्य-पर्व कालात श्रीकृष्ण भक्तिचे विशेष महत्व आहे.
पूजा-अर्चा, तीर्थ-स्नान, उपासना, दान-धर्म वगैरे रूढी प्रमाणे प्रचलित असणारी कर्मे पुढे उल्लेख  केल्या प्रमाणे विशेष भक्तीने केली जातात.
) अधिक मासात शक्यतो एका वेळेस जेवण करावे. जेवताना मौन पाळावे.
) दररोज देवासमोर दिवा लावावा. दीप दान करावे.
) मनाचा निग्रह वाढवण्यासाठी आपल्या आवडत्या वस्तूचा, खाद्य पदार्थाचा त्याग करावा.
) गायीला "गो-ग्रास" द्यावा.
) शक्य असेल तर शुद्ध आणि वद्य द्वादशी, पौर्णिमा आणि वद्य अष्टमी, नवमी, चतुर्दशी आणि अमावास्या ह्या तिथीला गरजूंना दान द्यावे.
) आपल्याकडे विवाहित कन्या आणि जावई हे "लक्ष्मी -नारायण " स्वरूप मानले जातात. म्हणून नारायण स्वरूप जावयाला तेहतीस च्या पटीत अपूप (अनारसे किंवा तत्सम सच्छिद्र/जाळीदार  पदार्थ ) दान दिले जाते.
) अधिक-मास महात्म्य ह्या पद्म -पुराणात उल्लेख असलेल्या पोथीचे दररोज एक अध्याय या प्रमाणे वाचन करावे.
) देव-पूजा अर्चा झाल्यावर भगवान श्रीकृष्णाला खालील मंत्र म्हणून अर्घ्य द्यावा.

"देव देव महाभाग प्रलयोत्पत्तिकारक कृष्ण सर्वेश भूतेश जगदानंदकारक गृहाणार्घ्यंमिमं देव दया कृत्वा ममोपरि।

)महिनाभर एकाग्रतेने, शुद्ध चित्ताने कुलदेवतेचे, श्रीविष्णू-नारायणाचे नामस्मरण करावे. "ओम नमो भगवते वासुदेवाय " ह्या मंत्राचा जप, विष्णुसहस्र नाम आणि गीता वाचनाचे महत्व आहे. गीता वाचनासोबत गीता सार समजावून घेणे महत्वाचे आहे. गीतेमधील उपनिषदांचे सार सर्वांसाठी, सर्व काळी, सर्व स्थळी मार्गदर्शक आहे. त्यामुळेच भारतात आणि इतरही अनेक देशांमध्ये अनेक भाषांमध्ये गीता तत्वज्ञान आदर्श मानले जात आहे. अधिक मासामध्ये अशा प्रकारे जाणीव पूर्वक केलेल्या साधनेचा शरीर-मनावर होणार परिणाम सकारात्मक होऊ शकतो. मनाची निर्मळता, शरीर-प्रकृतीचे आरोग्य वर्धन सद्-भावनांची जाणीव आणि भूतदया ह्या गोष्टींचा विचार ह्या नियम - पालना  मध्ये अभिप्रेत आहे.

              गोवर्धनधरं  वन्दे गोपालं गोपरुपिणम् | गोकुलोत्सवमीशानम्  गोविन्दं गोपिका प्रियं |
              भक्तिर्भवती गोविन्दे पुत्रपौत्र विवर्धनी | अकीर्तिक्षय माप्नोति सत्कीर्तिर्वधते चिरम् |
 

                                                                 सौ. जयश्री काजरेकर
 
Our mailing address is:

34 ALEXANDRIA CRESCENT, BRAMPTON, ON, L6T1N3, CANADA

EMAIL : CONTACT@SGYPARIWAR.COM



Want to change how you receive these emails?
You can update your preferences or unsubscribe from this list






This email was sent to *|EMAIL|*
why did I get this?    unsubscribe from this list    update subscription preferences
*|LIST:ADDRESSLINE|*

*|REWARDS|*

पितृ तर्पण - ह्या वर्षी ६ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर

भाद्रपद वद्य पक्ष, पितृ पंधरवडा हा जीवित नसलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्याचा, त्यांचे स्मरण करण्याचा कालावधी आहे . आज आपण जे जीवन जगत आहोत ते सुखकर होण्यासाठी अनेक प्रकारे सहाय्य केलेल्या अनेकानेक व्यक्तींचे स्मरणपूर्वक श्राद्ध करण्याची प्रथा आहे. वैकुंठवासी गुरु, आचार्य , शिष्य, आप्त, नातेवाईक, स्नेही, तसेच देश रक्षणार्थ धारातीर्थी पडलेले लढवय्ये- सैनिक, आणि नैसर्गिक आपत्तीत स्वर्गवासी झालेल्या निरपराध जीवांनाही श्रद्धायुक्त भावनेने श्रद्धांजली अर्पण करावी.

तर्पण हा शब्द संस्कृत तृप , म्हणजे संतुष्ट करणे ह्या पासून सिद्ध झाला आहे. देव, ऋषी, पितरांसाठी मंत्रोच्चारां समवेत जलांजली देऊन तृप्त करणे म्हणजे तर्पण होय. दरवर्षी पितृ पक्षातील या कालावधीत महालय श्राद्ध, ( पक्ष ), तर्पण, स्मरण करून इहलोक सोडून गेलेल्यांना सद्गती मिळावी म्हणून प्रार्थना करावी . हिंदू धर्माने सांगितलेले हे एक व्रत आहे. ह्या विधीकर्माने मृत व्यक्तींच्या वासना-इच्छा तृप्त होऊन आत्म्याला सद्गती मिळते.

 

श्रद्धया क्रियते यत्तद श्राद्धम् ।

 

मृत व्यक्तिच्या आत्म्यास तृप्ती मिळावी म्हणून श्रद्धेने, भावपूर्ण विचाराने श्राद्ध,पक्ष,तर्पण,दान,अन्नदान, अगर इतर अशी जी कृत्ये करतात त्यांना 'श्राद्ध' असे संबोधले जाते. विशिष्ट व्यक्तिंसाठी त्यांच्या मृत्यू तिथीला ते केले जाते. परंतु विवाह अथवा वास्तुशांती सारख्या मंगल प्रसंगी केले जाणारे ' नांदी श्राद्ध ' हे आपल्या अनेक दिवंगत पितरांसाठी करण्यात येणारे ' वृद्धी श्राद्ध ' आहे. तसेच महालय श्राद्ध हे देखील सर्व दिवंगतांसाठी असते. म्हणून ठराविक तिथीला करणे शक्य झाले नाही तर भाद्रपद अमावस्येला ते केले जाते. म्हणूनच या अमावास्येला ' सर्व पित्री अमावस्या ' म्हणतात . 

बहुतेक सर्व धर्मामध्ये , पाश्चिमात्य देशांमध्ये सुद्धा आपल्या पूर्वजांना, आपल्या क्षेम-कल्याणासाठी झटलेल्या व्यक्तींना वेगवेगळ्या प्रकारे कृतज्ञता अर्पण केली जाते. ह्या निमित्ताने येणाऱ्या पुढच्या पिढीतील सुजाणकारांना कृतज्ञता व्यक्त करण्याचे महत्व कळेल. आपल्या पूर्वजांच्या ठायी असलेल्या चांगल्या गुण स्वभावांची आठवण होईल आणि आपलेपणा बरोबर आदर भाव जपण्याची सवय होईल

.

ह्या सामाजिक बांधिलकी साठी ' श्री गणेशयाग परिवार ' गणेश उपासनेसोबत इतर कार्यक्रमांमध्ये दरवर्षी ' पितृ तर्पण ' विधीचे आयॊजन करीत असतो. ह्या वर्षी ६ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर हा पितृ पक्ष कालावधी आहे. तर्पण विधी आणि अन्नदान ( कॅनेडियन फूड बँकांच्या गरजे नुसार लागणाऱ्या वस्तू ) अथवा देणगी स्वरूपात स्वीकारलेली रक्कम गरजू संस्थांपर्यंत पोचवण्याचे कार्य परिवाराचे कार्यकर्ते एकनिष्ठ पणे करीत आहेत. आपल्या सर्वांच्या वैकुंठवासीयांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून पितृकार्य करणे हा सेवाधर्म आहे.

 

By Jayashree Kajarekar.

 

SGYP : Happy CANADA Day - 150

 

From SGYP to ALL - Happy CANADA Day - 150

CANADA 150

 

Shree Ganeshyag Pariwar Celebrates Canada 150 with

Arrival of Shree Siddhivinayak Temple, Mumbai – Kalas (Temple Dome Adornment) and

A Temple blessed Ganesh Murti (Marble Idol) to GTA.

Join us for Monthly Sankasthi Chaturthi Puja on Sunday, July 16, 2017 at Hindu Heritage Center, Mississauga.

 

Shree Ganeshyag Pariwar of Toronto (SGYP) celebrates CANADA 150 with

Food Donation Campaign in Support of Food Banks in Mississauga, Toronto, Hamilton and Kitchener- Waterloo area.

Donate generously – Cash (preferred) or Non-Perishable Food.

Let’s take care of the needy in our area!

Collection Date July 16, 2017 at the HHC

Let’s raise at least $1500.00

 

 

Shree Ganeshyag Pariwar of Toronto Celebrates CANADA 150 with

Shree Ganesh Puja (worship of God of Wisdom and Wealth) for

Peace, Prosperity and celebration of our multicultural Brotherhood!

 

Shree Ganeshyag Pariwar Celebrates CANADA 150 with

Our annual activities of Tree Planting, Blood Donation Camp, Fundraising for Cancer Research and Food Bank Donation.

Our esteemed efforts in Hindu Religious Spiritual Education and Promotion of Peace in our Society.

 

Shree Ganeshyag Pariwar of Toronto (SGYP), mostly Marathi language Speaking group of people from India, who call CANADA Home for over 50 years,

Celebrate CANADA 150 with

Deep commitment to CANADA’s Spiritual, Social, Economic growth and shepherding Good Environmental husbandry and creating Peace and Goodwill among nations.

 

Ganesha’s Blessings to ALL for CANADA 150!  

 

SGYP Blog post : "अक्षय तृतीयेला केलेले दान आणि हवन कधीही क्षयाला जात नाही"

अक्षय तृतीया

 -- सौ. जयश्री काजरेकर

वैशाख शुक्ल तृतीया हा दिवस साडे तीन मुहूर्तातील एक शुभ मुहुर्त आहे. अक्षय तृतीयेला कृत युग संपून त्रेता युग सुरु झाले. कालविभागाच्या या प्रारंभ दिवसाला ‘'युगादी' असे संबोधले जाते. ह्या शुभ-मुहूर्तावर किंमती वस्तू विशेषतः सोने खरेदी करण्याची माहिती सर्वांना आहे. या दिवशी सुरु केलेल्या कर्माचे फल अक्षय असते.

हयग्रीव, परशुराम अवतार या दिवशी प्रकट झाले. तसेच लिंगायत पंथाचे संस्थापक श्री बसवेश्वर ह्यांचा हा जन्म दिवस आहे. चैत्र शुद्ध तृतीयेपासुन सुरु झालेल्या चैत्र गौरी उत्सवाची याच दिवशी सांगता होते. पूर्वी स्वयंपाकघर, माजघर ह्या पलीकडील जगात एरवी फारसा वावर नसण्याऱ्या सुवासिनींना शालू, पैठण्या नेसून अलंकार घालून केसांमध्ये सुवासिक फुले माळुन समारंभाला जाण्याचे “वासंतिक हळदीकुंकू” हे निमित्त ह्या दिवसा पर्यंत असे.

भारतातील बद्रीधाम येथील बद्रीनारायणाच्या मंदिरात सहा महिन्या नंतर ह्या दिवशी प्रवेश मिळतो. तसेच अयोध्ये जवळच्या कुंजबिहारी श्रीकृष्ण मंदिराचे दरवाजे ह्याच दिवशी उघडतात. वृंदावन च्या श्री बांकेबिहारींच्या मंदिरात फक्त ह्याच दिवशी श्री विग्रहाचे चरण दर्शन होते.

हा दिवस अधिकतर प्रमाणात कृतज्ञता दिवस म्हणणे योग्य होईल. देवता व पितरांना तिल-तर्पण अर्पिले जाते. तसेच ज्या भूमीमधून अव्याहत पणे वनस्पती उगवत असतात त्या बद्दलहि कृतज्ञता व्यक्त केली जाते. नवीन औषधी वनस्पतींची आणि इतरही वनस्पतींची लागवड-पेरणी केली जाते. ह्या शुभ दिवशी पेरणी केलेल्या वनस्पती चांगल्या फुला-फळांनी बहरतात असा अनुभव आहे.

धार्मिक रुढी प्रमाणे ह्या दिवशी गंगा/समुद्र/तीर्थ स्नानाचे महत्व आहे. आरोग्य, सुख-समृद्धी प्राप्त करुन देण्याऱ्या देवतेची श्रद्धापूर्वक उपासना केली जाते. श्री विष्णू सहित वैभव लक्ष्मी चे पूजन करण्याचे विशेष महत्व आहे. श्री कृष्ण मूर्तिला चंदनाची उटी लावली जाते. परशुराम- सप्त चिरंजीवापैकी एक आहेत त्यांना अर्घ्य दिला जातो. विष्णु पूजन, श्रीकृष्ण भगवानाला चंदन लेपन,हवन,तर्पण आणि दान करताना चित्त वृत्ती अगदी शुद्ध ठेऊन सद्भाव मनात ठेवावा. देवता आणि पूर्वजांसाठी तीलतर्पण करताना, हे सर्व विश्व ज्यांनी निर्माण केले त्या परमेश्वराला आपण काही अर्पण करतो असे समजण्यापेक्षा त्या रूपाने कृतज्ञतेचा, शरणागतीचा भाव मनामध्ये आणावा.

 राम जन्माचे सुंदर वर्णन करताना कवीवर्य ग. दि.माडगूळकरांनी - "चैत्र मास, त्यात शुद्ध नवमि हि तिथी I गंध युक्त तरिही वात उष्ण हे किती II" ह्या शब्द पंक्तींमध्ये चैत्र- वैशाख महिन्याच्या उष्ण वात म्हणजेच उष्णतेच्या काहिलीची जाणीव प्रकट केलेली आहे. ह्या उन्हाळ्याचा त्रास कमी होण्यासाठीच जणु अक्षय तृतीयेला पाणपोई सुरु करणे, छत्री, चपला,पंखा, चंदन ह्या गोष्टींचे दान करणे पुण्यकारक मानले आहे. 'उदककुंभाचे'- वाळा मिश्रित पाण्या च्या घड्याचे दान करण्याची ही एक प्रथा आहे. परोपकार म्हणजे पुण्य आणि परपीडा म्हणजे पाप हे साधे सोपे समीकरण लक्षात घेऊन काही प्रथा सुरु केल्या असाव्यात.

भगवान श्रीकृष्णांनी युधिष्टिराला सांगितले होते की "अक्षय तृतीयेला केलेले दान आणि हवन कधीही क्षयाला जात नाही. देव आणि पूर्वज यांना उद्देशून केलेले कर्म अक्षय म्हणजे अविनाशी होते आणि दान पुण्यकारक होते." हे दान सत्पात्री असावे. सत्कार्यासाठी झटणाऱ्या संस्था, गरजू व्यक्ति,धर्म प्रसार करण्याऱ्या संस्थांना केलेले दान श्रेष्ठ होय.                

शुक्रवार दिनांक २८ एप्रिल ला अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर असे दान तुम्ही करु शकता. श्री गणेश याग परिवार हा गणेश उपासकांचा परिवार आहे. अर्थात कॅनडा स्थित सुहृदांचे हे एक कुटुंबच आहे. ह्या कौटुंबिक जिव्हाळ्याच्या जाणिवेतूनच कार्य कारिणीची वाटचाल सुरु असते. भारतातून नव्या स्वप्नांना घेऊन परदेशस्थ झालेले स्थायिक इथेही आपली संस्कृती, धर्म-धारणा जपत असतात. आपले सण-वार, देव-धर्म, आचार-विचारांचे परिपाठ नव्या पिढीला देत असतात. ह्या सर्व सुसंस्कृत समाजासाठी श्री गणेश याग परिवाराने श्री गणेश मंदिर वास्तू आणि सांस्कृतिक केंद्र उभारण्याचे ठरविले आहे. श्री गणेश याग परिवाराच्या नियोजित वास्तूसाठी तुम्ही अर्थ सहाय्य करु शकता. तुमच्या सारख्या भाविकांच्या सहाय्यानेच ह्या सांस्कृतिक मंदिराची उभारणी होणार आहे.

श्री गणेश याग परिवाराच्या संकेत स्थळावर अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर देणगी रुपाने दान देण्याचा संकल्प पूर्ण होऊ शकेल. http://www.sgypariwar.com/donate/

श्री गणेश याग परिवारातर्फे सर्वांना अक्षय सुख समृद्धी साठी हार्दिक शुभेच्छा!

SGYP: Blog post - गुढी पाडवा 2017

ब्रह्मपुराणानुसार ब्रह्म देवांनी ह्या जगाची,ब्रह्माण्डाची निर्मिती चैत्र शुध्द प्रतिपदा म्हणजे "गुढी पाडवा" ह्या दिवशी केली. पृथ्वीवर जीवनचक्राची सुरवात झाली. शालिवाहनाने शत्रूवर विजय मिळवला, तो हाच दिवस. श्री रामचंद्र चौदा वर्षे वनवास संपवून, रावण वध करुन अयोध्येत परतले तो हाच दिवस. त्या वेळेस लोकांनी गुढ्या-तोरणे उभारून विजयोत्सव साजरा केला. हा शालिवाहन शक पध्दती प्रमाणे वर्षाचा पहिला दिवस आहे. नारदांचे साठ पुत्र हीच साठ संवत्सरे होत. ह्या प्रत्येक संवत्सराचा पहिला दिवस ती हीच चैत्र शुध्द प्रतिपदा. ह्या वर्षी सुरु होणाऱ्या संवत्सराचे नाव “हेमलंबी नाम" आहे.

 

धार्मिक रूढी प्रमाणे वेळूच्या काठीवर रंगीत भरजरी कापडाचा ध्वज, कलश, पुष्पमाला, साखरेची गाठी, कडूलिंबाची पाने लावून गुढी उभारतात व "ब्रह्म ध्वजाय नमः" असे म्हणून गुढीचे पूजन करतात.

ब्रह्मध्वज नमस्तेअस्तु सर्वाभीष्ट फलप्रद

प्राप्ते अस्मिन्वत्सरे नित्यं मदगृहे मङ्गलं कुरुII - हा मंत्र म्हणून प्रार्थना करतात.

 

सर्व ऋतूंमध्ये श्रेष्ठ असणाऱ्या वसंत ऋतूचे आगमन प्रेरणादायी असते. वृक्षवेलींवर नवी पालवी येत असते. सगळीकडे आनंददायी आणि उत्साहवर्धक वातावरण असते.

गुढी पाडव्याच्या दिवशी विषेशतः सूर्योदयाच्या वेळेस वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणावर ‘तेजतत्व’ प्रक्षेपित होत असते. ते सात्विक तेज तत्व आपल्या मध्ये सामावून घेण्यासाठी प्रात:समयी, मंगलमय वातावरणात गुढी उभारून पूजा प्रार्थना करावी अशी परंपरा आहे.

 

 ह्या दिवशी विद्यार्थी, ज्ञानोपासक मनोभावे सरस्वतीची पूजा (पाटी-पूजा) म्हणजेच पाटीवर सरस्वती, सूर्य,चंद्र काढून पूजन करतात. नवे पंचांग घेऊन वर्ष-फल वाचतात. कडू लिंबाच्या सेवनाने शरीर तेजस्वी आणि निरोगी राहते म्हणून आरोग्यदायी कडूलिंबाचे सेवन करतात. नूतन वस्त्र- अलंकार परिधान करुन देवदर्शनाला जाण्याची प्रथा आहे.

 

साडे तीन मुहूर्तांपैकी हा एक सुमुहूर्त आहे. नवीन संकल्प, नवीन उपक्रम लोक ह्या दिवशी आरंभ करतात. ह्या मुहूर्तांवर सुरु केलेले कार्य निर्विघ्नपणे यशस्वी होते.

 

नूतन वर्ष निरामयी आनंददायी, आरोग्यदायी जावो. स्वप्न-संकल्प पूर्ती होण्यासाठी श्री सिद्धीविनायकाच्या चरणी मनोमन प्रार्थना.

आपणा सर्वांना श्री गणेश याग परिवारा तर्फे सुख शांती व समृद्धी साठी हार्दिक शुभेच्छा.

 

-- सौ जयश्री काजरेकर

 

SGYP : Blog post - होळी - हुताशनी पौर्णिमा

होळी - हुताशनी पौर्णिमा

 

“होळी रे होळी, पुरणाची पोळी” किंवा “होली  है!”- ह्या शब्दांच्या पाठोपाठ मौज-मजेत, जोशात रंग खेळणाऱ्या लोकांचा  समूह डोळ्यासमोर येतो. फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला होळी हा सण असतो. ह्या दिवसापासून पुढे पाच दिवस "रंगपंचमी" पर्यंत हा आनंदात साजरा केला जातो. महाराष्ट्रात शिमगा/होळी तसेच इतर प्रांतात फगवा, कामदहन, दोलायात्रा अशी वेगवेगळी नावे आहेत  पण सण  साजरा करण्यातली धमाल मात्र सारखीच आहे. शिशिर ऋतूमध्ये थंडीचे प्रमाण कमी होऊन उन्हाळ्याची सुरुवात होत असते. त्यावेळेस थंडीमध्ये दिलेल्या उबदार -उष्णतेसाठी व्यक्त केलेली कृतज्ञता आणि येणाऱ्या उन्हाळ्यात जास्ती दाहकता जाणवू नये म्हणून अग्निला केलेली प्रार्थना असा दुहेरी भाव ह्या वेळी मनात असतो. त्याचबरोबर मनमोहक रंगांनी निसर्ग फुलवणाऱ्या ऋतुराज वसंताचे हे रंगीत स्वागतही असते.

पौर्णिमेच्या दिवशी सायंकाळी शक्यतो देवळासमोर किंवा सोयीच्या मोकळ्या ठिकाणी सडा -संमार्जन करुन रांगोळी काढतात. एरंडाच्या झाडाची फांदी मध्ये ठेवून त्या भोवती गोवऱ्या, लाकडे जमवून होळी पेटवतात .

अस्माभिर्भय संत्रस्तॆ: कृता त्वं होलिके यतः I

अतस्त्वां पूजयिष्यामि भूते भूतिप्रदा भव II

असा मंत्र म्हणून पूजा करतात. होलिकायै नमः अशी प्रार्थना करुन होळी भोवती तीन प्रदक्षिणा घालून होळीमध्ये पुरण पोळीचा नैवेद्य आणि नारळ अर्पण करतात. होळीच्या धगधगणाऱ्या ज्वालां सभोवती रात्री  नाच, गाणी विनोद करत लोक मनसोक्त आनंद घेतात. होळी पूर्ण जळल्यावर दूध व तूप शिंपडून शांत करतात.

होळीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी "धुलीवंदनाला" होळीच्या राखेला वंदन करतात. ही रक्षा कपाळाला लावतात तसेच अंगाला लावून स्नान करण्याची प्रथा आहे. अलिकडे ह्या धुळवडीच्या दिवशी रंग खेळले जातात. आत्ता पर्यंत आपण पाहिलेच आहे  कि आपल्या प्रत्येक सण ,उत्सवांना नैसर्गिक परिस्थिती, ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि पौराणिक कथांचे संदर्भ आहेत.

पौराणिक कथा १) पूर्वी "ढुंढा" नावाची एक राक्षसीण लहान मुलांना अतिशय त्रास देत असे. तिच्या क्रूर स्वभावामुळे पालकांना मुलांची फार काळजी वाटत असे. ह्या त्रासावर उपाय शोधण्यासाठी सर्व लोक एकत्र आले. सांयकाळी ढुंढा येण्याच्या वेळेला प्रत्येक घरासमोर होळ्या पेटवल्या. लोक वाद्ये वाजवून मोठे मोठे आवाज करू लागले. काहीजण शंखनाद करू लागले. सगळीकडे अग्नि आणि सभोवताली  प्रतिकारासाठी  दक्ष असणाऱ्या माणसांना बघून  ती घाबरून पळून गेली. लोक आनंदाने होळी भोवती नाचू लागले. तेंव्हा पासून दुष्ट, राक्षसी प्रवृत्तीने मानवी मनामध्ये आणि समाजात प्रवेश करू नये म्हणून होळीची प्रथा सुरु  झाली.

२)शिवलीलामृत पोथीमध्ये मध्ये एक कथा आहे. तारकासुर नावाच्या एका दैत्याने सगळीकडे धुमाकूळ घातला होता. हैराण झालेल्या सर्वांनी परमेश्वराला हे संकट निवारण करण्यासाठी प्रार्थना केली. त्यावेळी भगवान शंकर आणि पार्वती देवीला होणारा पुत्र तारकासुराला ठार मारेल असे वरदान मिळाले. त्या साठी काय युक्ति करावी अशा अगतिक विचाराने कामदेव आणि त्याची पत्नी रतीने श्री शिव शंकर आणि पार्वती देवीच्या शरीरात प्रवेश करण्याचे ठरवले. ध्यानस्थ असलेल्या शिव शंकरांच्या  तपश्चर्येत कामदेवाने विघ्न आणले. त्यामुळे त्यांनी तिसरा डोळा उघडून क्रोधाने मदनाकडे बघितले आणि त्याच क्षणी मदन जळून भस्म  झाला. तो दिवस फाल्गुन शुद्ध पौर्णिमेचा होता. मदनाचे दहन झाल्यावर सर्व शिवगणांना आनंद झाला आणि तेंव्हापासून ह्या दिवशी  होळी करण्याची प्रथा सुरु झाली.

३)होळी बद्दल अजून एक भक्त प्रल्हादाची कथा आहे. हिरण्यकश्यपु  नावाचा राक्षस होता. ह्या दैत्याच्या  मनात देव-देवतां बद्दल राग -द्वेष  होता. परंतु त्याचा पुत्र प्रल्हाद भगवान विष्णुंचा निस्सीम भक्त होता. तो अतिशय श्रद्धेने विष्णुचे नामस्मरण करीत असे.  हिरण्यकश्यपुला हे आवडत नसे. त्याने अनेक प्रकारे प्रल्हादाला तसे न करण्यासाठी धाक दाखवून छळ केला. तरी देखील प्रल्हाद विष्णु भक्ति पासून परावृत्त झाला नाही. म्हणून निर्दयपणाने त्याला ठार मारण्याचे ठरविले. हिरण्यकश्यपुची बहिण होलिका होती. तिला सत्प्रवृत्त लोकांना तिने जर त्रास दिला नाही तर अग्निमध्ये ती जळू शकणार नाही असे वरदान होते. तिच्या  मांडीवर प्रल्हादाला बसवून दोघांनाही पेटलेल्या चितेवर-होळीवर  बसवले. होलिका त्या चितेमध्ये जळून गेली आणि प्रल्हाद मात्र श्री विष्णुकृपेने अगदी सुखरुप राहिला. पुढे भगवान विष्णुंनी खांबामधून प्रकट होऊन नरसिंह रुपाने हिरण्यकश्यपुला ठार मारले.

थोडक्यात होळीमध्ये दुष्ट वासनांचा, दुष्ट प्रवृतींचा नाश झाल्याच्या ह्या कथा आहेत. आज मितीला, आजच्या जमान्यात असणाऱ्या वाईट गोष्टींची रूपे समजून ,त्त्यांचा नाश करता आला तर सणांचे उद्देश खऱ्या अर्थाने सफल होतील. पहिल्या कथेत ढुंढा राक्षसीण लहान मुलांना त्रास देत होती. आज तीच वेगळ्या रूपात लहान मुलांना त्रास देती आहे. सर्व वयाच्या  मुलांना, विद्यार्थांना इंटरनेट आणि स्क्रीनची असलेली अतिरेकी आवड ही त्यांना त्रासच देती आहे. त्यांच्या मानसिक, शारीरिक आणि बौद्धिक क्षमतेचे जे नुकसान होते आहे त्या साठी आज पालकांना विचार करायला हवा आहे. दुसऱ्या कथेतील मदन अगतिक विचारांनी वाईट काम  करतो. आजही चांगल्या कामांमध्ये विघ्न आणणारे अविचारी लोक आहेतच. सदाचारी लोकांना विशेषतः महिलांच्या सुरक्षिततेला बाधा आणणारे दैत्य सुद्धा आहेत. तिसऱ्या कथेमध्ये  दैत्य कुलामध्ये जन्मलेला प्रह्लाद स्वतःच्या  प्रयत्नांनी आदर्श ठरला. युवा पिढीसाठी ह्यातून नक्कीच चांगला संदेश मिळू शकेल. पालकांनी दिलेल्या सोयी आणि सुविधा जेवढ्या मिळतील तेवढ्या असतातच, पण त्या मर्यादांच्या पलीकडे झेपावून प्रगतीसाठी प्रयत्न करता येतात. हा तो संदेश आहे.

समाजातील वाईट परंपरा संपवण्याचा संदेश होळी देते. तसेच वेगवेगळे मोहक रंग नेहमीच आपल्या जीवनात सुंदरता आणतात, सुखद रंग जपण्याचा संदेश देतात. भगवान श्रीकृष्णांनी गोपींसमवेत आणि सवंगड्यांसह हा खेळ खेळल्याचा उल्लेख श्रीकृष्ण कथांमध्ये आहे. धुलिवंदना पासून रंग-पंचमी पर्यंत रंग खेळताना एक वेगळाच आंनद, उत्साह असतो. लाल रंग पावित्र्याचे तर हिरवा रंग समृद्धीचे प्रतिक आहे. सोनेरी पिवळा रंग चैतन्यदायी आहे तर केशरी रंग वैराग्याची, भक्तीची भावना दर्शवितो. प्रत्यक्षात रंग खेळताना रंग कोणताही असला तरी मनातले हेवेदावे, गैरसमज विसरुन फक्त आणि फक्त आनंदच असतो. हा आनंद सात्विक असतो त्यात नशेची जोड नसावी. वाढत्या वैश्विक ऊष्मांकांमुळे पाऊस - पाण्याची अनिश्चितता लक्षात घेऊन समजूतदार लोक रंग खेळताना पाण्याचा दुरुपयोग टाळतात. तसेच नैसर्गिक रंग वापरुन आरोग्याचीही  काळजी घेतात. हा होलिकोत्सव सगळीकडे आनंद निर्माण करतो. सकारात्मक उत्साहाची रंगीत बरसात करतो.

श्री गणेश याग परिवारा तर्फे सर्वाना होळीच्या आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा.

होळीच्या पवित्र अग्नित प्रगतीला बाधा आणणाऱ्या नकारात्मक विचारांचा नाश होऊ देत.

रंग पंचमीच्या मनोहारी  रंगांसारखी  नव्या सकारत्मक विचारांनी  ध्येय साध्य होऊ देत.

सौ जयश्री काजरेकर

BLOG post article - श्री गणेश उपासना

।।श्री गणेश उपासना ।।

श्री गणेश हे भक्तांचे प्रिय आराध्य दैवत आहे. श्रुतिस्मृति पुराणांच्या  मधून गणेश परब्रह्म -परमात्म्याचे प्रतीक आहे हे मानले गेलेले आहे. तो सर्व संकटे, अडचणी , विघ्नांचा हर्ता आहे आणि सर्व विद्यांचा दाता आहे. मांगल्याची वृष्टी करणाऱ्या मंगल मूर्तीची सर्व कार्यारंभी, अन्य देवतांच्या पूजारंभी आद्य पूजा केली जाते. तसेच परंपराशील लेखक , कवी,कलाकार प्रथम गणेश वंदन करुनच नियोजित कामाला  सुरवात करतात . प्राचीन कालापासून ऋषि ,मुनि आचार्य ,संतांनी  "गणेश उपासनेचे" महत्व स्तोत्रे -सूक्तांच्या माध्यमातून सांगितले आहे. त्यामुळे भक्त -भाविकांच्या मनामध्ये श्री गणेश हा विघ्नहर्ता आणि मनोवांछित कामना पूर्ण करणारा म्हणून प्रसिध्द आहे.

गणेश भक्त आपापल्या श्रद्धेनुसार गणेशाची सगुण किंवा निर्गुण उपासना करीत असतात . त्यामध्ये पूजा-अर्चा,स्तोत्र पठण अनुष्ठान ,होम-हवन ,गणेश क्षेत्र यात्रा ,दानधर्म ,उपवास ,चतुर्थी व्रत वगैरे अनेक गोष्टींचा समावेश आहे .

वैदिक कालापासून हे एकच सत्य आहे कि विश्वाचा आधार असून, विश्व निर्माण करणे, त्याचे धारण -पोषण करणे आणि त्याचा लय हि सर्व कार्ये करणारे दैवत गणेशाला मानलेले आहे. अशा आदितत्व  "श्री गणेश आणि त्याची उपासना- ह्या ज्ञान सागराची व्याप्ती अनंत आहे. ग्रंथ ,गुरु आणि सत्संगाच्या माध्यमातून आपल्याला अधिकाधिक माहिती मिळत रहावी.

माघ वद्य चतुर्थी "शांभवी "चतुर्थीच्या निमित्ताने चतुर्थी तिथी बद्दल अगदी अल्प माहिती इथे देत आहे. गणेश उपासना आणि चतुर्थी ह्या दोन गोष्टी भक्त भाविकांच्या मनात एकत्रित श्रद्धेच्या आहेत . प्रत्येक मराठी महिन्याच्या वद्य पक्षात म्हणजे पौर्णिमे नंतर येणाऱ्या  चतुर्थीला "संकष्टी "चतुर्थी म्हणतात . अशी संकष्टी चतुर्थी मंगळवारी आली तर तिला विशेष महत्व असून त्या संकष्टीला "अंगारिका " किंवा "अंगारकी " चतुर्थी म्हणतात . ह्या बद्दल श्री गणेश पुराणात एक कथा आहे.

भरद्वाज मुनींना पृथ्वी पासून एक पुत्र झाला लाल वर्णाच्या ह्या मुलाचे नाव भौम असे होते. तो मुलगा मोठा झाल्यावर योग्य समयी मुनींनी त्याला विद्या - अभ्यास शिकवून, उपदेश देऊन गणेशाचा शुभ मंत्र  दिला. त्याने नर्मदा   नदीच्या काठावर बसून, मनामध्ये "हेरंबाचे" ध्यान करत परम मंत्राचा जप केला. माघ  वाद्य चतुर्थीला, मंगळवारी दशभुज गणपतीने त्याला दर्शन दिले आणि त्याला वर देताना असे सांगितले, "हि तिथी सर्व संकटांचे हरण करणारी आणि व्रत करणाऱ्यास इष्ट फल देणारी होईल. हे भौमा तू देवांसमवेत अमृत प्राशन करशील आणि जगामध्ये "मंगल " ह्या नावाने प्रसिद्ध होशील. तुझा वर्ण लाल आहे तू पृथ्वी पुत्र असल्याने तुला अंगारक असेही म्हणतील". अशा रितीने भौमाने -मंगलाने -अंगारकाने केलेली संकष्टी चतुर्थी "अंगारकी चतुर्थी "ह्या नावाने प्रसिद्ध झाली . प्रत्येक प्राणिमात्राला शारीरिक, मानसिक तसेच व्यावहारिक  जगामध्ये  मध्ये वेगवेगळी संकटे येतात. त्या संकटांना धैर्याने सामोरे जाण्यासाठी संकष्ट चतुर्थीचे व्रत केले जाते.

प्रत्येक मराठी महिन्याच्या शुद्ध चतुर्थीला म्हणजे अमावस्येनंतर येणाऱ्या चतुर्थीला “विनायकी” अथवा  वरद चतुर्थी म्हणतात. गणेशाचे दोन मुख्य  उत्सव- भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थी आणि माघ महिन्यातील गणेश जयंती हे दोन्ही शुद्ध चतुर्थीला म्हणजे विनायकी चतुर्थीला साजरे केले जातात.

गणेश उपासनेत अथर्वशीर्ष पठणाला अन्यन साधारण महत्व आहे. त्यामध्ये गणेशाचे सगुण आणि निर्गुण स्वरूप वर्णन केलेले आहे. ओम नमस्ते ---- ह्या ऋचे पासून वरद मूर्तये नमः --ह्या ऋचे पर्यंत श्री गणेशाची साधना प्रतिपादन केलेली आहे . फलश्रुति मध्ये अथर्वशीर्ष  अध्ययनाचे महत्व सांगितलेले आहे.

चतुर्थ्यामनश्नन् जपति विद्यावान् भवति इत्यथर्वणवाक्यम्

अर्थात- चतुर्थीच्या दिवशी मनोभावे अथर्वशीर्षाचे पठण करतो तो विद्यावान  होतो. हे अथर्व ऋषीचे वचन आहे.

आपण ज्या ठिकाणी ,ज्या मुक्कामीं राहत असतो त्या गावाचे अक्षांश -रेखांश तसेच सूर्योदय -चंद्रोदय त्यांची गती अशा गोंष्टींवर तिथि, नक्षत्र, योग वगैरे कालगणना करणाऱ्या गोष्टी अवलंबून असतात. त्या स्थानिक पंचांगाप्रमाणे असणाऱ्या तिथि प्रमाण मानून व्रते, सण, उत्सव साजरे करणे योग्य आहे .

चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची यथासांग पूजा करावी. उपलब्ध असतील तशी लाल फुले, दूर्वा, नैवेद्य, दक्षिणा, फळे अर्पण करावी. स्तोत्रे, सूक्त पठण करावीत. आरती करावी. शक्य असेल त्यांनी उपवास करावा. ह्या कर्मांबरोबर  मानसिक शुचिर्भूतता सोबत असावी. दुष्ट कर्म, निंदा-नालस्ती, इतरांचा राग-द्वेष , क्षुद्र विचारसरणी निग्रहपूर्वक टाळावी. संध्याकाळी चंद्रोदय झाल्यावर पुनः गणेश पूजन, नैवेद्य, आरती करुन गणेशाला आणि चंद्राला अर्घ्य देऊन क्षमा प्रार्थना करावी.  शक्य असेल तर गायन वादन वगैरे मन तल्लिन करणारे संगीत कार्यक्रम करावेत असे पुराणांमध्ये उल्लेख आहेत.

श्री गणेश याग परिवार गेली अनेक वर्षे सातत्याने गणेश उपासने मध्ये कार्यरत आहे. देशकालाला अनुसरुन उपासने सोबत अन्य धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम सर्व गणेश भक्त यशस्वी करत आहेत  आणि नवे संकल्प करत आहेत. गणेश भक्तांनीं -भक्तांसाठी सुरु केलेल्या ह्या कर्मयोगात तुमचा सर्वांचा सहभाग प्रार्थनीय आहे.

मंगलमूर्ति चरणी आपणा सर्वांसाठी मंगल चिंतन .

श्री गणेश याग परिवार.

-सौ जयश्री काजरेकर  

मकर संक्रांत 2017 - " तिळगूळ घ्या गोड गोड बोला “

 

मकर संक्रांत    " तिळगूळ  घ्या गोड गोड बोला “

मकर संक्रांतीच्या दिवशी सर्व आप्त, स्नेही परिचितांना तिळगूळ देऊन गोड बोलण्याचे मनोगत व्यक्त केले जाते. सूर्याचे मकर राशीत संक्रमण होते तो दिवस म्हणजे ' मकर संक्रांत'.  उत्तरायण सुरु होताना सर्वात मोठी रात्र संपलेली असते. अंधार संपून प्रकाशाचे साम्राज्य सुरु होत असल्याने उत्तरायण हे पवित्र मानले जाते. म्हणून त्याला ' देवायन ' असेही नाव आहे. उत्तरायण सुरु झाल्यावर येणारा सण मकर संक्रांत आहे. नैसर्गिक, भौगोलिक वातावरण, सांस्कृतिक परंपरा आणि पौराणिक कथा वगैरे गोष्टींना अनुसरून हा सण आनंदात साजरा केला जातो.   

संक्रांतीच्या अदल्या दिवशी ' भोगी ' आणि  नंतरच्या दिवशी ' किंक्रांत हे दिन विशेष आहेत . भारतीय हवामानानुसार शरद ऋतु पासून सुरु झालेली थंडी चढत्या क्रमाने हवेत गारठा वाढवित असते. शेत मळ्यांमध्ये धान्य, ऊस, हरभरा, आणि  भाज्या, मुबलक  प्रमाणात तयार झालेल्या असतात , त्यामुळे भोगीच्या दिवशी बाजरीची भाकरी , लोणी आणि वांगी -पावटा -गाजर -मटार अशा अनेक भाज्या एकत्र करून केलेली ' लेकूरवाळी ' भाजी  मुगाच्या डाळीची खिचडी तूप असा जेवणाचा बेत असतो.  संक्रांतीच्या दिवशी गुळाची पोळी -तूप असा बेत करतात . संक्रांतीच्या दिवसा पासून रथ सप्तमी पर्यंत तिळगूळ - हलवा एक मेकांना देऊन आपण शुभेच्छा देतो . थंडीपासून बचाव करण्यासाठी शरिरात ऊर्जा निर्माण करणाऱ्या पदार्थांची ही आहार योजना आहे. या सणाला काळे कपडे परिधान करण्या मागे सुद्धा ऊर्जा मिळवण्याचाच हेतू असावा.

स्निग्धता वाढवणारे तीळ  स्नानाच्या पाण्यात घालणे , तिळाचे उटणे वापरणे, तिळाचे हवन करून होम करणे , तीळ युक्त जलाने तर्पण करणे आणि तीळ-दान करणे , अशी प्रथा आहे. मकर संक्रांत ते रथ सप्तमी हा कालावधी " पर्व काळ " असल्याने साधने साठी पूरक असतो. तसेच या कालावधीत केलेले दान विशेष फलद्रूप होते. हळदी कुंकू, तिळगूळ समारंभ, वगैरे उत्साहात साजरे केले जातात. गुजरात मध्ये या कालात आकाशात वैविध्य पूर्ण पतंग उडवण्याची प्रथा आहे. तिळामधील  स्नेह- स्निग्धता आणि गूळ किंवा साखरेतील माधुर्य -गोडवा नाते संबंधात जपण्याची जाणिव जोपासली जाते. महिला वर्गाच्या कल्पकतेला वाव दिला जातो . संक्रांत सणाच्या  निमित्ताने हलव्याचे विविध प्रकार , हलव्याचे दागिने, कलात्मक पिशव्या भेटकार्डे , कलाकुसरीने साकारली जातात.

ह्या सणाबद्दल पौराणिक कथांमध्ये उल्लेख आहेत . परमेश्वराने देवीचे रूप घेऊन " संकरासूर " दैत्याचा वध करून सर्वांना निर्भयतेने राहण्यासाठी सहाय्य् केले. अशी कथा आहे. त्याला अनुसरून पंचागा मध्ये संक्रांतीचे स्त्री रूपात वर्णन केलेले असते . भगीरथ राजाने गंगा पृथ्वीवर आणण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती . शिव शंकराच्या कृपा प्रसादाने त्याची तपश्चर्या फलद्रूप झाली  आणि गंगा पृथ्वीवर अवतरली. संक्रांतीच्या पुण्य दिवशी भगीरथ राजाने      " गंगासागर " कपिलमुनी आश्रम येथे त्याच्या पूर्वजांसाठी तर्पण केले असा उल्लेख आहे. 

रथसप्तमीच्या दिवशी तुळशी वृन्दावनाजवळ पाटावर रक्त चंदनाने सात घोड्यांच्या रथा मध्ये विराजमान झालेल्या सूर्याची प्रतिमा काढून, तांबडी फुले, तांबडे गंध वाहून सूर्याची पूजा करतात, खिरीचा नैवेद्य दाखवतात.

आपल्या बहुतेक सर्व सण, उत्सवांना शास्त्रीय आधार आहे . तुळस ही अशी वनस्पस्ती आहे जी उच्छवासा वाटे मुबलक प्रमाणात प्राणवायू उत्सर्जित करते . हवेतील प्रदूषण कमी करून वातावरण शुद्ध करण्यासाठी मदत करते. ह्या वनस्पतीच्या सान्निध्यात मनोभावे पूजा करताना जी एकाग्रता आवश्यक आहे ती निर्विकार मनोधारणेसाठी पोषक आहे . सात्विक पोषण मूलये असलेल्या खिरीचा प्रसाद हा आरोग्य वर्धक आहे. थोडक्यात शुद्ध वातावरण, निर्विकार स्वस्थ मन आणि सात्विक आहार ही त्रिसूत्री सांभाळून बलोपासना -सूर्योपासना केली तर आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभेल हे दाखले पुराण काळा पासून आपल्याला मिळालेले आहेत.

आज बदलत्या देश कालानुरूप विज्ञानाच्या निकषावर सिद्ध झालेल्या गोष्टींचा सारासार विचार करून सण साजरे केले तर संस्कृती  जपली जाईल आणि मानवी जीवन निरामय आणि सुकर होईल. संक्रांतीचे महत्व जाणून सूर्योपासना, सामूहिक सूर्य नमस्कार संकल्प , गायत्री  मंत्र पठण असे कार्यक्रम आज केले जातात . श्री समर्थ रामदास स्वामींसारख्या धर्म रक्षणार्थ झटणाऱ्या संतांनी आरोग्य वर्धनासाठी सूर्योपासनेचे महत्व सांगितले आहे. सर्वांच्या निरामय, स्वस्थ आरोग्यासाठी ते वरदानच ठरावे .

श्री गणेशयाग परिवारातर्फे सर्वांना संक्रांतीच्या स्नेहपूर्ण शुभेच्छा .

 " तिळगूळ  घ्या गोड गोड  बोला

 

- सौ. जयश्री काजरेकर

 

  

 

   

SPECIAL MESSAGE - Jan 1st, 2017.

II  गं गणपतये नमः II


SHREE GANESH YAG PARIWAR


wants to say - " A BIG Thank You to Everyone".

To all attendees, sponsors & volunteers supporting community's cause.

"Shree Ganesh Yag Pariwar always look forward to provision community with more opportunities to receive Bappa's blessings." 

Please do JOIN us at all our monthly events on Ganesh Chaturthi & the annual event of Ganesh Jayanti.

HAPPY NEW YEAR 2017 to All -- May Divine blessings be always with you and your family.

                                                                                

दीपावली - 2016         

 

दसऱ्या पाठोपाठ येणारा आपला आवडता सण म्हणजे ‘ दिवाळी ‘. दिव्यांची  रोषणाई , मातीचे किल्ले , फटाके फोडणे कलाकुसरीचे आकाश-कंदिल ,पणत्या ,मनमोहक रांगोळ्या ,किंमती वस्तूंची खरेदी ,आप्त-स्नेही मंडळींबरोबर फराळ-मिष्टान्नांची मेजवानी ,शुभेच्छा अशा अनेक गोष्टी आपण आंनदाने आणि उत्साहाने करतो .

अलिकडे "दिवाळी-पहाट "सारख्या  सुश्राव्य  संगीत ,किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांची  पण ह्या आनंदात हजेरी असते. सगळीकडे सकारात्मक आणि आनंददायी ऊर्जा निर्माण करणारा हा आपला जगप्रसिद्ध सण आहे .

आश्विन वद्य द्वादशी ते कार्तिक शुद्ध द्वितीया ह्या कालावधीत प्रत्येक दिवस  वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो .

ह्या कालावधीत दररोज दीप लावले असता त्या घरी लक्ष्मी सर्वकाल  स्थिर रहाते, असे मानले जाते.  

 

ऑक्टोबर २६, बुधवार   :    आश्विन वद्य द्वादशी ---वसु बारस \गोवत्स द्वादशी  

संध्याकाळी गायीची पाडसा सोबत पूजा केली जाते . आपल्याला दूध-दुभते देणारी गाय ( कामधेनू  )  आणि  शेतीच्या कामासाठी उपयोगी असणाऱ्या बैलांसाठी कृतज्ञता व्यक्त केली जाते.  

 

ऑक्टोबर २७,गुरुवार  :  धनत्रयोदशी ,  धनतेरस , धन्वंतरि जयंती 

धनतेरस- धनरूपी लक्ष्मीची प्रार्थना करून नीतीने धन संचय करण्याचा संकल्प करावा.

यमदीप दान- मृत्युलोकाचा अधिपती यम आहे त्याची अवकृपा होऊ नये म्हणून त्याच्या नावाने हा  हळद , कणकीचा   दिवा सांयकाळी  दक्षिणेकडे ज्योति  करून  घराबाहेर ठेवतात. दिव्याची हळद-कुंकू ,फुले वाहून  पूजा करतात.

"मृत्युना पाशदंडाभ्यां कालेन श्यामयासह त्रायोद्श्याम दीप दानात सूर्यज :प्रीयतां  मम .

हा श्लोक म्हणून दिव्याला नमस्कार करावा .  अपमृत्यु येवू नये म्हणून प्रार्थना करावी.

 धन्वंतरि जयंती-

"सुधा कुंभ धरो हस्ते श्रीशो धन्वंतरी सदा ।  ज्ञान मुद्रा युतशचैवम तस्मै भगवते नमः II

हा श्लोक म्हणून उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्यासाठी धन्वंतरीची-देवांच्या वैद्याची प्रार्थना करतात. 

 

 

ऑक्टोबर २९, शनिवार  :  नरक चतुर्दशी , यमतर्पण ,अमावास्या , लक्ष्मी पूजन

नरक चतुर्दशीआश्विन वद्य चतुर्दशीला श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला आणि बंदिवासात असलेल्या स्त्रियांना मुक्त केले.  त्या आनंदा प्रित्यर्थ प्रजेने नगरात रांगोळ्यांनी सुशोभित केलेल्या मार्गांवर  दिवे लावून  श्रीकृष्णांचे स्वागत केले .अभ्यंग स्नान आणि पक्वांन्नांचे भोजन केले अशी  कथा आहे. त्या आठवणी साठी नरक चतुर्दशीला पहाटे लवकर उठून  उटणे,  सुगंधी तेल लावून स्नान करतात.

यमतर्पण

अपमृत्यू  येऊ नये म्हणून वडिल असणाऱ्यांनी पाण्यामध्ये अक्षता घालून आणि वडिल नसणाऱ्यांनी पाण्यामध्ये काळे तीळ घालून पुढील यम आणि यमाच्या सहाय्यक देवतांची नावे घेऊन अर्धे स्नान झाल्यावर शक्यतो तांब्याच्या ताम्हणामध्ये  तर्पण करावे . तर्पण झाल्यावर  स्नान पूर्ण  करावे.

१)  यमं तर्पयामि , २) धर्मराजमं तर्पयामि,३) मृत्यु   तर्पयामि ,४) अंतकं   तर्पयामि, ५) वैव स्ततं  तर्पयामि६)कालं तर्पयामि,  ७) सर्वभूतक्षयकरं तर्पयामि ८) औदुंबरं   तर्पयामि ९) दधनं    तर्पयामि ,१०)नीलं   तर्पयामि, ११) परमेष्ठीं  तर्पयामि, १२)वृकोदरं  तर्पयामि, १३) चित्रं   तर्पयामि, १४) चित्रगुप्तम   तर्पयामि.

नंतर दक्षिणेकडे तोंड करून पुढील शलोक दहा वेळेला म्हणावा .

यमोनिहंता  पितृधर्मराजो  वैवस्वतो दंडधरश्च  काल: भूताधिपो  दत्त कृतानुसारी कृतांत एतद्दशभिर्जपंति  ।। 

सुरक्षिततेसाठी प्रार्थना करावी .

घरातील जेष्ठ सुवासिनी सर्वांना औक्षण करते. . सूर्योदयापूर्वी देवपूजा करतात . नवे कपडे ,दागिने घालून देवालयात जातात .

मित्र मंडळींसोबत फराळ, भोजन करतात.

लक्ष्मी पूजन

संध्याकाळी  सुमूहर्तावर "लक्ष्मी- कुबेर  पूजन "  करतात .

प्रथम गणपतीची पूजा करावी . 

पाटावर किंवा चौरंगावर तांदुळाच्या राशीवर ताटात  नाणी ,सोने,चांदी, रत्ने  --अलन्काराच्या रूपात लक्ष्मीची  स्थापना करावी. श्री सूक्त  म्हणून मनोभावे  लक्ष्मीची पूजा करावी . धणे ,गूळ , साळीच्या लाह्या , बत्ताश्याचा नैवेद्य दाखवावा .  नविन वर्षात लक्ष्मीची कृपा राहावी  म्हणून प्रार्थना करावी .

ह्या दिवशी नवीन केरसुणी आणून पूजा केली जाते .

अलक्ष्मी नि:सारण --अलक्ष्मी म्हणजे दैन्य -दारिद्र्य आणि नि:सारण म्हणजे बाहेर टाकणे .

घरातील अमंगल ,घाण बाहेर  काढल्यावर स्वच्छ ,सुशोभित ठिकाणी लक्ष्मी स्थिर राहते .

कार्तिक शुद्ध प्रतिपदेपासून व्यापारी लोकांचे नवे वर्ष सुरू होते . म्हणून ते  ह्याच दिवशी  हिशेबाच्या वह्यांची पूजा करतात .

 

 

ऑक्टोबर ३१, सोमवार     :   बलि प्रतिपदा, गोवर्धन पूजा आणि अन्नकुट -- दिवाळी पाडवा  

बलि प्रतिपदा- प्रल्हादाचा नातू , विरोचनचा  पुत्र  "बली " हा एक पराक्रमी श्रीमंत राजा होऊन गेला .त्याने आपल्या पराक्रमाच्या जोरावर देवांना त्रास देऊन लक्ष्मीला कोंडून ठेवले होते.

तेंव्हा भगवान विष्णूंनी वामनाचे रूप धारण केले आणि ते बटूच्या वेशात बलीराजा  कडे गेले व फक्त तीन पावले ठेवता येतील एवढी भूमि दान करण्याची विनंती केली . उदार बलीने ते मान्य केल्यावर वामनाने एकाएकी प्रचंड रूप धारण केले . एका पावलाने पृथ्वी आणि एका पावलाने स्वर्ग व्यापला . तिसरे पाऊल ठेवण्यास जागा नसल्याने ते बलीच्या डोक्यावर ठेऊन त्याला पाताळात दडपले. पण त्या वेळेस  बलीच्या विनंती वरून त्याला बली प्रतिपदेला लोक तुझी पूजा करतील असा  वर विष्णूंनी दिला. अशी कथा आहे.

 म्हणून ह्या  दिवशी बलीची पूजा करण्याची प्रथा आहे.

बलिराज नमस्तुभ्यं विरोचनसुत प्रभो ।भविष्येन्द्रसुराराते पुजेयं  प्रतिगृह्यतां  ।।

हा श्लोक म्हणावा तसेच गरजू लोकांना  यथाशक्ति दान केले असता विष्णूला संतोष होतो असे मानले जाते .  

दिवाळी पाडवा- ह्या दिवशी  विक्रम संवत सुरु होते. साडे तीन मुहूर्तांपैकी  दिवाळी पाडवा हा एक सुमुहूर्त आहे.

 गोवर्धन पूजा आणि अन्नकुट- भगवान श्रीकृष्णांची पूजा  करतात व अनेक प्रकारच्या खाद्य पदार्थांचा नैवेद्य दाखवतात .

दिवाळी पाडव्याला पत्नी पतीला औक्षण करते आणि पती पत्नीला भेट वस्तू देतो .  

 

 

नोव्हेम्बर, मंगळवार :  कार्तिक शुद्ध द्वितीया - यम द्वितीया, भाऊबीज  

यम द्वितीया / भाऊबीज - यमराजाने ह्या दिवशी यमुना ह्या आपल्या बहिणीकडे जाऊन भोजन केले म्हणून ह्या दिवसाला यमद्वितीया असे नाव आहे . ह्या दिवशी बहिणआपल्या भावाला बोलावून पाहुणचार करते  आणि भाऊ बहिणीला प्रेमाचे प्रतीक म्हणून भेट वस्तू देतो .

पौराणिक कथा , रूढी ,परंपरां ह्यांच्या  माध्यमातून  देशकालानुसार  ह्या सणाद्वारे   स्नेही ,आप्त ,नात्यांमध्ये आपुलकी आणि प्रेम भाव  जपायचा आहे .आरोग्य वर्धन आणि नीतीने धन मिळवण्यासाठी संकल्प करायचे आहेत .जेष्ठ, जाणकारांना वंदन करून मार्गदर्शना साठी आशीर्वाद घ्यायचे आहेत.  ज्ञान ,कला गुणांच्या विकासासाठी प्रकाश दायी दीपांचा दीपोत्सव साजरा करायचा आहे .

निरामय आरोग्य आणि समृद्ध आयुष्यासाठी, श्री गणेश याग परिवारातर्फे  सर्वांना  दिवाळीच्या  मनःपूर्वक शुभेच्छा !

 

शुभ दीपावली.

शारदीय नवरात्री उत्सव -सौ जयश्री काजरेकर

 

आपल्या संस्कृती  मध्ये उत्सव, व्रते, सण साजरे करण्यामागे विशेष प्रयोजन आहे. पौराणिक कथा, धार्मिक रूढी आणि व्यक्तिगत तसेच सामाजिक हिताचा विचार त्यामध्ये सामावलेला आहे . पारंपरिक पद्धतीने केवळ अनुकरण करण्या पेक्षा त्याबद्दल उपलब्ध असणारी माहिती समजली तर सण,उत्सव वगैरे साजरे करण्यात उत्स्फूर्त सहभाग आणि आनंद मिळेल.

ह्या वर्षी शनिवार १ ऑक्टोबर पासून  " नवरात्री उत्सव “ सुरु होत आहे .  शरद ऋतू मध्ये, अश्विन शुद्ध प्रतिपदे पासून, अश्विन शुद्ध नवमी पर्यंत हा उत्सव असतो. चैत्र, माघ वगैरे महिन्यांमध्ये ही  नवरात्र असते, परंतु हे शरद ऋतू मधील नवरात्र म्हणून ' शारदीय नवरात्र '.

आदिशक्ति  दुर्गा देवीने महिषासुरादि  आसुरांशी  ९ दिवस घनघोर युद्ध करून त्या आसुरांचा वध केला ही  मार्कंडेय पुराणात कथा आहे. त्या घटनेच्या आठवणी निमित्त  हा  नवरात्र  उत्सव आहे. जेंव्हा  तामसी, आसुरी, क्रूर लोक प्रबळ होतात आणि सात्विक, धर्मनिष्ठ  प्रामाणिक लोकांना त्रास देतात, तेव्हा देव, देवता धर्म संस्थापने करता पुन :पुनः अवतार घेतात. ( गीता , अध्याय ४था श्लोक ७,८ ).

महिषासुर दैत्याने सगळीकडे धुमाकूळ घातला होता. देव देवता, ऋषी मुनी , साधू संत , सज्जनांना त्रासवून सोडले होते. अनेक देवांचे अधिकार महिषासुराने स्वतः कडे घेतले होते. या क्रोध कारक परिस्थितीत ब्रम्हा, विष्णू, महेश यांच्या मुखापासून तसेच इंद्रादि  देवतांच्या शरीरातून प्रचंड तेज बाहेर पडले आणि त्या अतुल  तेजाने स्त्री रूप धारण केले, तीच ही आदिशक्ति   दुर्गा देवी होय. या तेजोमय दुर्गा देवीच्या दर्शनाने सर्व देवांना अतिशयआनंद झाला

दुष्ट प्रवृत्तीच्या महिषासुराशी युद्ध करण्यासाठी, त्याला पराभूत करण्यासाठी सर्व देवांनी तिला आपली आयुधे दिली. शंभू महादेवाने आपला त्रिशूल दिला, श्रीहरी विष्णूने चक्र दिले, वरुणाने शंख दिला, अग्नीने शक्ति  दिली वायूने  चाप-आणि बाण दिले, सहस्त्राक्षाने वज्र आणि ऐरावताची घंटा दिली, यमाने दंड दिला,  ब्रह्मदेवाने  कमंडलु  आणि जपमाळा दिली,  हिमालयाने वाहन म्हणून सिंह दिला, तर समुद्राने सुंदर कमळ दिले. इतर देव देवतांनीही विविध आभूषणे आणि अस्त्रे दिली. अश्विन शु. प्रतिपदा ते अश्विन शु. नवमी  या कालावधीमध्ये दुर्गा देवीने महिषासुरादि दैत्यांशी युद्ध करून त्यांचा वध केल्याने तिला महिषासुरमर्दिनी म्हणतात. या कालावधीमध्ये ' देवीतत्त्व ' अधिक प्रमाणात कार्यरत असते. आणि ब्रम्हांडातील दुष्ट शक्तींचा दुर्गा देवी संहार करते. देवीमहात्म्य / दुर्गा सप्त शती या ग्रंथांमध्ये दुर्गादेवीच्या पराक्रमाच्या आणि महिषासुरादि दैत्यांवरील विजयाच्या कथा आहेत.

नवरात्र पूजा विधीमध्ये नैमित्तिकपूजेतील सर्व उपचारांसोबत घटस्थापना, अंकुरारोपण,अखंड नंदादीप स्थापना,देवी स्थापना, आणि मालाबंधन करण्याचा परिपाठ आहे.  या पूजा विधीत कुलाचारांना प्राधान्य असते, त्यामुळे विधींमध्ये थोडाफार फरक असू शकतो . मंत्रोपचार पूजाविधी स्वतंत्र दिलेला आहे.

 

 

१. घटस्थापना

नित्य पूजेच्या देवाच्या उजव्या बाजूस परडी मध्ये  माती पसरावी. त्यावर (वेदिकेवर) मध्यभागी हळद कुंकू लावलेला , शुद्ध पाण्याने भरलेला कलश ठेवावा. कलाशामध्ये  चंदन, हळद, आंबेहळद, नागरमोथा, इत्यादि औषधी वनस्पती अक्षता, फुले, दुर्वा, सुपारी, नाणे घालावे. कलशावर आंब्याची किंवा विड्याची पाने घालून त्यावर नारळ ठेवावा. आणि घटस्थापना करावी. गंध, फुल, अक्षता, हळद-कुंकू वाहून  घटाची  पूजा आणि प्रार्थना करावी.  आपआपल्या कुलाचारा प्रमाणे देवता स्थापना घटावरील ताम्हणात अथवा घटावर नारळ ठेवल्यास स्वतंत्र ताम्हणात काठोकाठ तांदूळ भरून हळदीचे अष्ट दल काढून त्यात करावी.

**देवतांकडून सात्विक लहरी आकर्षित करून घेण्याची क्षमता जास्त असणाऱ्या जिनसा घटामध्ये घालतात.

२. अंकुरारोपण

घटस्थापनेनंतर कलशाभोवती मातीमध्ये ९ प्रकारची धान्ये - सातू, साळी, गहू, मूग, हरभरे, वगैरे पेरावे. नवव्या दिवसा पर्यंत हे छोटेसे शेत छान फुलून येते.

दसऱ्याच्या दिवशी या शेतात उगवलेले तृणांकूर देवाला वाहतात आणि आप्त जनांना आपट्याच्या पानाबरोबर सोने म्हणून देतात.

** या धान्यांपैकी जे धान्य या कालावधीत जास्ती जोमाने उगवते, त्या धान्याची पेरणी करणे योग्य आहे हा संकेत शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक असतो.

३. अखंड नंदादीप

देवी समोर नवरात्रामध्ये अखंड नंदादीप तेवत ठेवतात. हा दीप तुपाचा असेल तर देवीच्या उजव्या बाजूला आणि तेलाचा असेल  तर देवीच्या डाव्या बाजूला ठेवतात. ज्या ठिकाणी हा नंदादीप ठेवायचा असतो त्या स्थळाची गंध, अक्षता, फुले वाहून पूजा करावी. आणि नंतर दीप प्रज्वलन करून दिव्याची सुद्धा पूजा करून प्रार्थना करावी.

**दीप हे तेजाचे प्रतीक आहे.  नवरात्रात वायूमंडल   शक्ती तत्त्वात्मक तेजाने भारित असल्यामुळे सतत तेवत असलेल्या दीपज्योतीकडे तेज-तत्त्वात्मक लहरी आकर्षित होतात. अखंड दीप प्रज्वलनाने या लहरींचे वास्तूत वास्तव्य राहते. दीप हे प्रकाशाचे / ज्ञानाचे प्रतीक आहे. अज्ञानाचा अंध:कार नाहीसा करण्यासाठी याचे महत्व आहे.

४. देवता स्थापना

कलशावर अथवा उच्चासनावर लाल रेशमी वस्त्र घालून पूर्ण पात्रामध्ये ,काठोकाठ तांदूळ भरून त्यावर हळदीचे अष्टदल कमल काढून त्यावर देवता स्थापना करतात. महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती स्वरूपिणी दुर्गादेवी तसेच कुलदेवतेची स्थापना करतात . नवदुर्गा  ही  दुर्गादेवीच्या ९ नांवांनी संबोधिली जाते. ही  दुर्गेची ९ रूपे - १. शैलपुत्री, २. ब्रह्मचारिणी, ३. चंद्रघंटा, ४. कूष्मांडी, ५.स्कंदमाता, ६. कात्यायनी , ७. कालरात्री , ८.महागौरी, ९. सिद्धीदात्री.  अशी आहेत.

 

 

५. मालाबंधन

घटस्थापनेच्या दिवशी विड्याच्या पानांची माला बांधली जाते. तसेच ९  दिवस विविध फुलांची माळ घटावर लोंबती बांधली जाते.

घटस्थापनेदिवशी यथाविधी  षोडशोपचार पूजा केल्यानंतर , नवरात्र संपेपर्यंत  देवी, घट, आणि नंदादीप त्यांच्या जागेवरून हलवायचे नसतात. दररोज सकाळी आणि संध्याकाळी पूजा ,नैवेद्य ,आरती वगैरे उपचार मनोभावे करतात.

देवीची  ५ व्या दिवशी उपांग ललिता,

७ व्या दिवशी विद्या आणि कलांची देवता सरस्वती         

८ व्या दिवशी संपत्ती आणि ऐश्वर्याची देवता लक्ष्मी आणि

९ व्या दिवशी शक्ति आणि विजयाची देवता दुर्गा  या विशेष स्वरूपात पूजा केली जाते.

देवीमाहात्म्य ( सप्तशती पाठ ) , श्री सूक्त, ललिता सहस्र नाम, देवी सहस्र नाम, कुंकूमार्चन, जप, हवन  अशा नानाविध उपासना करण्याचा परिपाठ आहे.  तसेच कुमारिका आणि सुवासिनी पूजनाचे महत्व आहे. 

 या काळात भोंडला / हादगा, खेळला जातो. पाटावर हत्तीचे चित्र काढून त्या भोवती फेर धरून भोंडल्याची पारंपरिक गाणी म्हटली जातात. बरेच ठिकाणी ' गरबा' खेळला जातो. टाळ्यांच्या लयबद्ध ठेक्यात किंवा टिपऱ्यांच्या तालावर   देवीचे गुण गान करणारी गाणी गायली जातात .  सार्वजनिक गणेशोत्सवाप्रमाणे दुर्गा देवीची मूर्ति  स्थापन करून दुर्गा पूजा उत्सव ही  मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो.

आदिमाया दुर्गादेवी अनेक रूपांमधून ब्रह्माण्डातील दुष्ट शक्तींचा नाश करून, सज्जनांचे रक्षण, मंगल, कल्याण करणारी शक्ति आहे. त्या शक्तीच्या उपासनेसाठी हा नवरात्र उत्सव .

 

विजया दशमी - दसरा

 

अश्विन शुध्द दशमी म्हणजे नवरात्री संपल्यानंतरचा हा दिवस. नवरात्रीच्या कालावधीत दुर्गा देवीने आसुरांशी युध्द  केले आणि महिषासुरादि  दैत्यांचा वध केला. तसेच श्री. रामचंद्रांनी रावणाशी युद्ध केले आणि रावण वध केला. अज्ञात वासात असलेल्या पांडवांनी ह्याच कालावधीत विराट राजाच्या बाजूने कौरवांशी युद्ध करून त्यांना पराभूत केले तो हाच दिवस.

दुष्ट, दुर्जनां विरुद्ध संघटित शक्तीने लढा देऊन अंती विजय मिळाल्याचा आनंद प्रेरणादायी असतो. ह्या विजय कथांच्या आठवणीं प्रित्यर्थ दसऱ्याच्या ह्या सणाला विजया दशमी असे संबोधले जाते.

साडे तीन मुहूर्तांपैकी हा एक अत्यंत शुभ मुहूर्त आहे. ह्या दिवशी नवीन उपक्रमांना सुरुवात करतात. तसेच जे जे कोणी ज्या ज्या क्षेत्रात काम, उद्योग करतात ते ते सर्व जण आपल्या कामी येणाऱ्या उपकरणांची, वाहनांची पूजा करतात. विद्यार्थी सरस्वती पूजन करतात.

हा दिवस सीमोलंघनाचा आहे. आपण आजवर जे कार्य करत असतो त्यामध्ये अजून पुढची प्रगती करण्याचा निश्चय ह्या शुभ मुहूर्तावर केला जातो.


॥ श्रीगणेश पूजन ॥

॥  श्रीगणेश पूजन ॥

श्री गणेश प्राणप्रतिष्ठा साहित्य
हळद
कुंकू 
अक्षता
गुलाल
अष्टगंध ( चंदन पावडर ) 
अबीर
सुपारी १०
खारीक५
बदाम५
हळकुंड५
अक्रोड५
ब्लाउज पीस१
कापसाची वस्त्रे (गेजवस्त्र)
जानवी जोड २
पंचा१
तांदूळ 
तुळशी बेल दुर्वा
फुले 
पत्री
हार१
आंब्याच्या डहाळी 
नारळ२
फळे५
विड्याची पाने २५
पंचामृत
कलश२
ताह्मण१
संध्या पळी
पंचपात्र
सुटे रुपये १०
नैवेद्याची तयारी
समई
वाती
निरांजन
कापूर
गणेशाची मूर्ती आदल्या दिवशी आणून ठेवावी.गुरूजी येण्यापूर्वी मूर्ती मखरात ठेवावी,सर्व पूजेचे साहित्य तयार ठेवावे
बसण्या साठी आसन किंवा बेडशीट

पूजेसंबंधिच्या काही सूचना
श्रीगणेशाचे पूजन करताना शुचिर्भूत असावे,घरात वाद विवाद न करता प्रसन्नपणे सर्वांनी एकत्र असावे.पूजा करणारी व्यक्ती यज्ञोपवीत(जानवे) घातलेले असावे. देवास काहीही समर्पण करत असताना ते उजव्या हातानेच वहावे.मूर्ती वर पाणी, पंचामृत, अर्घ्य वाहताना फुलाने किंवा दुर्वांनी वहावे.वडीलधाऱ्यांपैकी एकाने पूजा सांगावी. त्यांच्या पेक्षा लहान व्यक्तीने पूजा करावी 🏻🏻🏻


पार्थिवगणेशपूजा प्रारंभ:-
प्रथम कपाळी तिलक धारण करून आचमन करावे देवापुढे पानसुपारीचा विडा ठेवावा देवास नमस्कार करून वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घ्यावेत आणि पुजेला प्रारंभ करावा.
खालीलप्रमाणे प्रत्येक देवतेचे स्मरण करून नमस्कार करावा

ॐ श्रीमन्महागणपतये नम:॥
ॐइष्ट देवताभ्यो नमः ||
ॐकुल देवताभ्यो नमः ||
ॐग्राम देवताभ्यो नमः ||
ॐवास्तु देवताभ्यो नमः ||
ॐगुरू देवताभ्यो नम:॥
नंतर हातात अक्षता घेऊन श्रीगणेशाचे मनात स्मरण करावे आणि खालीलप्रमाणे मंत्र म्हणावेत

सुमुखश्च एकदंतश्च कपिलो गजकर्णकः||
लंबोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः||
धुम्रकेतुर् गणाध्यक्षो भालचंद्रो गजाननः||
द्वादशैतानि नामानी यःपठेद् शृणुयादपि ||
विद्यारंभे विवाहेच प्रवेशे निर्गमे तथा ||
संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते ||

अक्षता श्रीगणेशाच्या पायांवर वहाव्यात.नंतर उजव्या हातात दोन पळ्या पाणी घेऊन त्यात गंध अक्षता फुले घेऊन खालीलप्रमाणे संकल्प म्हणावा रिकाम्या जागी आपल्या नाव गोत्राचा उच्चार करावा

श्रीमद्भगवतो महापुरुषस्य..शालिवाहनशके मन्मथ नामसंवत्सरे, दक्षिणायने, वर्षा ऋतौ, भाद्रपद मासे, शुक्लपक्षे, चतुर्थ्यां तिथौ, बृहस्पति वासरे, स्वाती दिवस नक्षत्रे, तुला स्थिते वर्तमाने चंद्रे, सिंह स्थिते श्रीसूर्ये, सिंह स्थिते श्रीदेवगुरौ, शुभपुण्यतिथौ....॥
मम आत्मन: श्रुतिस्मृति-पुराणोक्त फलप्राप्त्यर्थं श्रीपरमेश्वर प्रीत्यर्थं...........गोत्रोत्पन्नाय ........शर्माणं अहं अस्माकं सकलकुटुंबानां सपरिवाराणां समस्त शुभफल प्राप्त्यर्थं प्रतिवार्षिक विहितं {पार्थिवसिद्धिविनायक} देवता प्रीत्यर्थं यथाज्ञानेन यथामिलित उपचार द्रव्यै: प्राणप्रतिष्ठापन पूर्वक ध्यानआवाहनादि षोडश उपचार पूजन अहं करिष्ये॥
पाणी ताह्मणात सोडावे. पुन्हा पाणी हातात घेऊन खालीलप्रमाणे उच्चार करावा.
आदौ निर्विघ्नता सिद्ध्यर्थं महागणपति स्मरणं, शरीर शुद्ध्यर्थं षडंगन्यासं कलश, शंख, घंटा, दीप पूजनं च करिष्ये॥
ताह्मणात पाणी सोडावे.नंतर श्रीगणेशाचे स्मरण करून कलश,शंख,घंटा,दिवा समई यांची पूजा करावी गंध, अक्षता, फुले,हळद कुंकू वहावे

॥प्राणप्रतिष्ठा॥

पुढीलप्रमाणे उच्चार करून मुर्तीच्या नेत्रांना दुर्वांनी तूप लावावे दोन्हीही हातांनी मूर्ती वर छाया करावी

अस्यां मृन्मयमूर्तौ प्राणप्रतिष्ठापने विनियोग:॥
॥ॐ आं -हीं क्रों॥ अं यं रं लं वं शं षं सं हं ळं क्षं अ:॥ क्रों -हीं आं हंस: सोहं॥
अस्यां मूर्तौ १ प्राण २ जीव ३ सर्वेंद्रियाणि वाङ् मन:त्वक् चक्षु श्रोत्र जिव्हा घ्राण पाणि पाद पायूपस्थानि इहैवागत्य सुखं चिरं तिष्ठंतु स्वाहा॥
नमस्कार करून उजवा हात मूर्ती वर ठेवावा डावा हात स्वतःच्या हृदयास स्पर्श करून खालीलप्रमाणे उच्चार करावा 
गर्भाधानादि षोडष संस्कार सिद्ध्यर्थं षोडष प्रणवावृती: करिष्ये॥
आणि श्रीगणेशास स्पर्श करून मनात १६वेळा "ॐ" म्हणावे नंतर श्रीगणेशाच्या नेत्रांना तूप लावावे.
ॐअस्यै प्राणा: प्रतिष्ठंतु अस्यै प्राणा:क्षरंतु च।
अस्यै देवत्वमर्चायै मामहेति च कश्चन॥

श्रीगणेशाचे ध्यानं करावे
ॐएकदंतं शूर्पकर्णं गजवक्त्रं चतुर्भुजं।
पाशांकुशधरं देवं ध्यायेत्सिद्धिविनायकं॥

श्रीगणेशाच्या पायांवर अक्षता वहाव्यात 
ॐआवाहयामि विघ्नेश सुरराजार्चितेश्वर।
अनाथनाथ सर्वज्ञ पूजार्थं गणनायक॥
श्रीगणेशास अक्षता वाहून सिंहासन अर्पण करत आहोत अशी कल्पना करावी
ॐनानारत्न समायुक्तं कार्तस्वरविभूषितम्।
आसनं देवदेवेश प्रीत्यर्थं प्रतिगृह्यताम्॥

श्रीगणेशाच्या चरणांवर दुर्वा किंवा फुलाने पाणी  शिंपावे
ॐपाद्यं गृहाण देवेश सर्वक्षेमसमर्थ भो।
भक्त्या समर्पितं तुभ्यं लोकनाथ नमोस्तु ते॥

श्रीगणेशाच्या चरणांवर गंध फुल अक्षता यांनी युक्त  पाणी वहावे
ॐनमस्ते देव देवेश नमस्ते धरणीधर।
नमस्ते जगदाधार अर्घ्यं न: प्रतिगृह्यताम॥

ताह्मणात ४वेळा पाणी सोडावे
ॐकर्पूरवासितं वारि मंदाकिन्या:समाहृतम्।
आचम्यतां जगन्नाथ मया दत्तं हि भक्तित:॥

श्रीगणेशाच्या मूर्तीवर पाणी शिंपावे
ॐगंगादिसर्वतीर्थेभ्यो मया प्रार्थनया हृतम्।
तोयमेतत्सुखस्पर्शं स्नानार्थं प्रतिगृह्यताम्॥

श्रीगणेशाच्या चरणांवर पंचामृत वहावे
ॐपंचामृत मयोनीतं पयः दधी घृतं मधु
शर्करा सह संयुक्तं स्नानार्थ प्रतिगृह्यताम्

श्रीगणेशास शुद्धोदक वहावे
ॐश्रीगणेशाय नमः शुद्धोदकं समर्पयामी

श्रीगणेशास अक्षता वहाव्यात 
ॐश्रीगणेशाय नमः सुप्रतिष्ठितमस्तु॥

श्रीगणेशास वस्त्रे वहावीत 
ॐसर्वभूषाधिके सौम्ये लोकलज्जानिवारणे।
मयोपपादिते तुभ्यं वाससी प्रतिगृह्यताम्।

श्रीगणेशास यज्ञोपवीत वहावे 
ॐदेवदेव नमस्तेतु त्राहिमां भवसागरात्।
ब्रह्मसूत्रं सोत्तरीयं गृहाण परमेश्वर॥

श्रीगणेशास गंध लावावे 
ॐश्रीखंडं चंदनं दिव्यं गंधाढ्यं सुमनोहरम्।
विलेपनं सुरश्रेष्ठ चंदनं प्रतिगृह्यताम्॥

श्रीगणेशास अक्षता वहाव्यात ॐअक्षतास्तंडुला:शुभ्रा:कुंकूमेन विराजिता:।
मया निवेदिता भक्त्या गृहाण परमेश्वर॥

श्रीगणेशास हळद वहावी 
ॐहरिद्रा स्वर्णवर्णाभा सर्वसौभाग्यदायिनी।
सर्वालंकारमुख्या हि देवि त्वं प्रतिगृह्यताम्॥
श्रीगणेशास कुंकू वहावे ॐहरिद्राचूर्णसंयुक्तं कुंकुमं कामदायकम्।
वस्त्रालंकारणं सर्वं देवि त्वं प्रतिगृह्यताम्॥

श्रीगणेशास शेंदूर वहावा ॐउदितारुणसंकाश जपाकुसुमसंनिभम्।
सीमंतभूषणार्थाय सिंदूरं प्रतिगृह्यताम्॥

श्रीगणेशास गुलाल अबीर वहावे
ॐज्योत्स्नापते नमस्तुभ्यं नमस्ते विश्वरूपिणे।
नानापरिमलद्रव्यं गृहाण परमेश्वर॥

श्रीगणेशास फुले,हार,कंठी,दुर्वा  वहावे 
ॐमाल्यादीनि सुगंधीनि मालत्यादीनि वै प्रभो।
मया हृतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यताम्॥

श्रीगणेशाच्या प्रत्येक अवयवांवर अक्षता वहाव्यात 
॥अथ अंग पूजा॥
ॐगणेश्वराय नम:-पादौ पूजयामि॥(पाय)
ॐविघ्नराजाय नम:-जानुनी पू०॥(गुडघे)
ॐआखुवाहनाय नम:-ऊरू पू०॥(मांड्या)
ॐहेरंबाय नम:-कटिं पू०॥ (कंबर)
ॐलंबोदराय नम:-उदरं पू०॥ (पोट)
ॐगौरीसुताय नम:-स्तनौ पू०॥(स्तन)
ॐगणनायकाय नम:- हृदयं पू॥(हृदय)
ॐस्थूलकर्णाय नम:-कंठं पू०॥(कंठ)
ॐस्कंदाग्रजाय नम:-स्कंधौ पू०॥(खांदे)
ॐपाशहस्ताय नम:-हस्तौ पू०॥(हात)
ॐगजवक्त्राय नम:-वक्त्रं पू०॥(मुख)
ॐविघ्नहत्रे नम:-ललाटं पू०॥(कपाळ)
ॐसर्वेश्वराय नम:- शिर:पू०॥(मस्तक)
ॐगणाधिपाय नम:-सर्वांगं पूजयामि॥
(सर्वांग)

श्रीगणेशास विविध पत्री अर्पण कराव्यात 
अथ पत्र पूजा:-
ॐसुमुखायनम:-मालतीपत्रं समर्पयामि॥(मधुमालती)
ॐगणाधिपायनम:-भृंगराजपत्रं॥(माका)
ॐउमापुत्रायनम:-बिल्वपत्रं॥(बेल)
ॐगजाननायनम:-श्वेतदूर्वापत्रं॥(पांढ-यादूर्वा)
ॐलंबोदरायनम:-बदरीपत्रं॥(बोर)
ॐहरसूनवेनम:-धत्तूरपत्रं॥(धोत्रा)
ॐगजकर्णकायनम:-तुलसीपत्रं॥(तुळस)
ॐवक्रतुंडायनम:-शमीपत्रं॥(शमी)
ॐगुहाग्रजायनम:-अपामार्गपत्रं॥(आघाडा)
ॐएकदंतायनम:-बृहतीपत्रं॥(डोरली)
ॐविकटायनम:-करवीरपत्रं॥(कण्हेरी)
ॐकपिलायनम:-अर्कपत्रं॥(मांदार)
ॐगजदंतायनम:-अर्जुनपत्रं॥(अर्जुनसादडा)
ॐविघ्नराजायनम:-विष्णुक्रांतापत्रं॥(विष्णुक्रांत)
ॐबटवेनम:-दाडिमपत्रं॥(डाळिंब)
ॐसुराग्रजायनम:-देवदारुपत्रं॥(देवदार)
ॐभालचंद्रायनम:-मरुपत्रं॥(पांढरा मरवा)
ॐहेरंबायनम:-अश्वत्थपत्रं॥(पिंपळ)
ॐचतुर्भुजायनम:-जातीपत्रं॥(जाई)
ॐविनायकायनम:-केतकीपत्रं॥(केवडा)
ॐसर्वेश्वरायनम:-अगस्तिपत्रं॥(अगस्ति)

श्रीगणेशास धूप,अगरबत्ती ओवाळावी
ॐवनस्पतिरसोद्भूतो गंधाढ्यो गंधउत्तम:।
आघ्रेय:सर्वदेवानां धूपोयं प्रतिगृह्यताम्॥

श्रीगणेशास दीप,निरांजन ओवाळावे
ॐआज्यंच वर्तिसंयुक्तं वह्निना योजितं मया।
दीपं गृहाण देवेश सर्वक्षेमसमर्थ भो:॥

श्रीगणेशास नैवेद्य,प्रसाद समर्पण करावा 
ॐशर्कराखंडखद्यानी दधिक्षीरघृतानिच।
आहारं भक्ष्यभोज्यं च नैवेद्यं प्रतिगृह्यताम्॥
श्रीगणेशास विडा अर्पण ॐकरावापूगीफलं महद्दिव्यं नागवल्लीदलैर्युतं।
कर्पूरैलासमायुक्तं तांबूलं प्रतिगृह्यताम्॥

श्रीगणेशाच्या समोरील विड्यावर दक्षिणा ठेवावी 
ॐहिरण्यगर्भ गर्भस्थं हेमबीजं विभावसो:।
अनंतपुण्यफलद मत:शातिं प्रयच्छ मे॥
श्रीगणेशाच्या समोरील नारळावर पळीभर पाणीq सोडावे आणि त्यावर एक फुल वहावे 
ॐइदं फलं मयादेव स्थापितं पुरतस्तव।p
तेन मे सुफलावाप्तिर्भवेज्जन्मनि जन्मनि॥
खालीलप्रमाणे श्रीगणेशास दोन-दोन दुर्वा वहाव्यात 
दूर्वायुग्म पूजा-
ॐ गणाधिपायनम:-दूर्वायुग्मं समर्पयामि॥
ॐ उमापुत्रायनम:-दूर्वायुग्मं ०॥
ॐ अघनाशनायनम:-दूर्वायुग्मं ०॥
ॐ विनायकायनम:-दूर्वायुग्मं ०॥
ॐ ईशपुत्रायनम:-दूर्वायुग्मं०॥
ॐ सर्वसिद्धिप्रदायकायनम:-दूर्वायुग्मं ०॥
ॐ एकदंतायनम:-दूर्वायुग्मं ०॥
ॐ इभवक्त्रायनम:-दूर्वायुग्मं ०॥
ॐ आखुवाहनायनम:-दूर्वायुग्मं ०॥
ॐ कुमारगुरवेनम:-दूर्वायुग्मं ०॥

श्रीगणेशाची आरती करावी
स्वतः भोवती प्रदक्षिणा करावी
ॐयानि कानि च पापानि जन्मांतरकृतानि च।
तानि तानि विनश्यंति प्रदक्षिण पदे पदे॥

श्रीगणेशास नमस्कार करावा
ॐनमस्ते विघ्नसंहर्त्रे नमस्ते ईप्सितप्रद।
नमस्ते देवदेवेश नमस्ते गणनायक॥

श्रीगणेशाची प्रार्थना करावी
ॐविनायकगणेशान सर्वदेवनमस्कृत।
पार्वतीप्रिय विघ्नेश मम विघ्नान्निवारय॥i

एक पळीभर पाणी ताह्मणात सोडावे
ॐअनेन मया यथाज्ञानेन कृत पूजनेन तेन श्रीसिद्धिविनायक:प्रीयताम्॥

गुढी पाडवा by Shri. Chandrashekhar Parkhi

श्री स्वामी समर्थ

नमस्कार,

नुकत्याच झालेल्या पाड्व्या बद्दल विचारणा झाली म्हणून हे प्रस्तविक. मुलांपर्यंत हि माहिती अवश्य पोचवा

◆ गुढीपाडव्याच्या दिवशी वर्षारंभ करण्याचे नैसर्गिक, ऐतिहासिक व आध्यात्मिक महत्त्व!

महत्त्व : इसवी सन १ जानेवारीपासून, आर्थिक वर्ष २१मार्च, हिंदु वर्ष चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून, व्यापारी वर्ष कार्तिक शुद्ध प्रतिपदेपासून, शैक्षणिक वर्ष जूनपासून, सौर वर्ष, चांद्र वर्ष व सौर-चांद्र वर्ष (लुनी सोलर) या वर्षांचेही निरनिराळे वर्षारंभ, इतके वर्षारंभ करण्याचे दिवस आहेत. यांत सर्वत्र बारा महिन्यांचेच वर्ष आहे. वर्ष बारा महिन्यांचे असावे', असे प्रथम कोणी सांगितले व जगाने ते कसे मान्य केले ? याचा प्रथम उद्‌गातावेद' आहे. वेद हे अतीप्राचीन वाड्गमय आहे, याबद्दल दुमत नाही. द्वादशमासै: संवत्सर: ।' असे वेदात आहे. वेदांनी सांगितले म्हणून ते जगाने मान्य केले. या सर्व वर्षारंभांतील अधिक योग्य प्रारंभदिवसचैत्र शुद्ध प्रतिपदा' हा आहे. १ जानेवारीला वर्षारंभ का, याला काहीही कारण नाही. कोणीतरी ठरविले व ते सुरू झाले. याउलट चैत्र शुद्ध प्रतिपदेस वर्षारंभ करण्यास नैसर्गिक, ऐतिहासिक व आध्यात्मिक कारणे आहेत.

◆ नैसर्गिक : ज्योतिषशास्त्रानुसार पाडव्याच्या आसपासच सूर्य वसंत- संपातावर येतो (संपात बिंदू म्हणजे क्रांतीवृत्त व विषुववृत्त ही दोन वर्तुळे ज्या बिंदूत परस्परांस छेदतात तो बिंदू होय.) व वसंत ऋतू सुरू होतो. सर्व ऋतूंत `कुसुमाकरी वसंत ऋतू ही माझी विभूती आहे', असे भगवंतांनी श्रीमद्‌भगवद्‍गीतेत (१०:३५) म्हटले आहे. या वेळी समशीतोष्ण अशी उत्साहवर्धक व आल्हाददायक हवा असते. शिशिर ऋतूत झाडांची पाने गळून गेलेली असतात, तर पाडव्याच्या सुमारास झाडांना नवी पालवी येत असते. वृक्षवल्ली टवटवीत दिसतात.

◆ ऐतिहासिक : या दिवशी
अ. रामाने वालीचा वध केला.
आ. राक्षसांचा व रावणाचा वध करून भगवान रामचंद्र अयोध्येला परत आले.
इ. शकांनी हुणांचा पराभव करून विजय मिळवला.
ई. या दिवसापासूनच `शालिवाहन शक' सुरू झाले; कारण या दिवशी शालिवाहनाने शत्रूवर विजय मिळवला.

◆ आध्यात्मिक
सृष्टीची निर्मिती : ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, म्हणजे सत्ययुगाला सुरुवात झाली, तो हा दिवस असल्याने या दिवशी वर्षारंभ केला जातो.
१ जानेवारी नव्हे, तर गुढीपाडवा हाच पृथ्वीचा खरा वर्षारंभदिन : `गुढीपाडव्याला सुरू होणारे नवीन वर्षाचे कालचक्र हे विश्‍वाच्या उत्पत्तीकाळाशी निगडित असल्याने सृष्टी नवचेतनेने भारित होते. याउलट ३१ डिसेंबरला रात्री १२ वाजता सुरू होणारे नवीन वर्षाचे कालचक्र हे विश्‍वाच्या लयकाळाशी निगडित असते. गुढीपाडव्याला सुरू होणार्‍या नववर्षाची तुलना सूर्योदयाला उगवणार्‍या तेजोमयी दिवसाशी करता येईल.

◆ गुढी उभारण्याची पद्धत:
चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा हा हिंदु धर्मियांचा वर्षातील पहिला सण व नूतन वर्षाचा पहिला दिवस. अभ्यंगस्नान करणे, दाराला तोरणे लावणे व पूजा यांबरोबरच घरोघरी गुढी उभारून हा सण साजरा केला जातो. दुष्ट प्रवृत्तींच्या राक्षसांचा व रावणाचा वध करून भगवान श्रीराम अयोध्येत परत आले, तो हाच दिवस. ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती याच दिवशी केली. अशा या सणाला हिंदूंच्या जीवनात विशेष महत्त्व आहे. सूर्योदयाच्या वेळी प्रक्षेपित होणारे चैतन्य खूप वेळ टिकणारे असल्यामुळे सूर्योदयानंतर ५ ते १० मिनिटांत गुढीची पूजा करावी !
गुढीपाडव्याच्या दिवशी तेज व प्रजापति लहरी मोठ्या प्रमाणात कार्यरत असतात. सूर्योदयाच्या वेळी या लहरींतून प्रक्षेपित होणारे चैतन्य खूप वेळ टिकणारे असते. ते जिवाच्या पेशींत साठवून ठेवले जाते व आवश्यकतेनुसार त्या जिवाकडून ते वापरले जाते. त्यामुळे सूर्योदयानंतर ५ ते १० मिनिटांत गुढीची पूजा करावी.

◆ गुढीचे स्थान : गुढी उभी करतांना ती दरवाजाच्या बाहेर; परंतु उंबरठ्यालगत (घरातून पाहिल्यास) उजव्या बाजूला उभी करावी.

◆ पद्धत :
• अ. गुढी उभी करतांना सर्वप्रथम सडासंमार्जन करून अंगण रांगोळीने सुशोभित करावे गुढी उभारण्याच्या जागी रांगोळीने स्वस्तिक काढून त्याच्या मध्यबिंदूवर हळद-कुंकू वाहावे.
• आ. गुढी उभी करतांना ब्रह्मांडातील शिव-शक्‍तीच्या लहरींना आवाहन करून तिची स्वस्तिकावर स्थापना करावी. यामुळे गुढीच्या टोकावर अस लेल्या सर्व घटकांना देवत्व प्राप्‍त होते.
• इ. गुढी जमिनीवर उंबरठ्यालगत; परंतु थोडीशी झुकलेल्या स्थितीत उभी करावी.

◆ आंब्याच्या पानांचे महत्त्व
इतर पानांपेक्षा आंब्याच्या पानांत जास्त सात्त्विकता असल्यामुळे त्यांची ईश्‍वरी तत्त्व खेचून घेण्याची क्षमता अधिक असते. गुढीच्या टोकाला आंब्याची पाने बांधली जातात. कोवळया पानांत तेजतत्त्व अधिक असते, म्हणून पूजेत आंब्याच्या कोवळया पानांचा वापर करावा.

◆ कडूलिंबाच्या पानांचे महत्त्व
गुढीला कडूलिंबाची माळ घातली जाते. ईश्‍वरी तत्त्व खेचून घेण्याची क्षमता आंब्याच्या पानांनंतर कडूलिंबाच्या पानांत जास्त असते. या दिवशी कडूलिंबाच्या कोवळया पानांद्वारे वातावरणात पसरलेल्या प्रजापति लहरी खेचून घेतल्या जातात. प्रजापति लहरी ग्रहण करण्यासाठी आवश्यक गुण सर्वसाधारण व्यक्‍तीत ईश्‍वराकडून येणार्‍या लहरी ग्रहण करण्याची क्षमता खूप कमी असते.
खालील गुण असणारा जीव या लहरी अधिकाधिक प्रमाणात ग्रहण करू शकतो.
१. अंतर्मनापासून सातत्याने ईश्‍वराचे स्मरण करणे
२. गुरु व ईश्‍वर यांच्यावर अढळ श्रद्धा असणे
३. ईश्‍वराची संकल्प शक्‍ती कार्यरत असणे
४. शक्‍तीचा वापर राष्ट्र व धर्म यांच्या कार्यांसाठी करणे
सूर्यास्तानंतर लगेचच गुढी उतरवावी ज्या भावाने गुढीची पूजा केली जाते, त्याच भावाने गुढी खाली उतरवली पाहिजे, तरच जिवाला तिच्यातील चैतन्य मिळते. गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवून व प्रार्थना करून गुढी खाली उतरवावी. गुढीला घातलेले सर्व साहित्य दैनंदिन वापरातील वस्तूंच्या शेजारी ठेवावे. गुढीला अर्पण केलेली फुले व आंब्याची पाने यांचे वाहत्या पाण्यात विसर्जन करावे. गुढी सूर्यास्तानंतर लगेचच खाली उतरवावी. सूर्यास्तानंतर १ ते २ तासांत वातावरणात वाईट शक्‍ती कार्यरत होऊ लागतात. सूर्यास्तानंतरही गुढी उभी असल्यास त्यात वाईट शक्‍ती प्रवेश करू शकतात. त्या शक्‍तींचा आपल्याला त्रास होऊ शकतो.
गुढीची पूजा करतांना व गुढी उतरवतांना पुढील प्रार्थना करावी
• अ. गुढीची पूजा करतांना करावयाची प्रार्थना : `हे ब्रह्मदेवा, हे विष्णु, या गुढीच्या माध्यमातून वातावरणातील प्रजापति, सूर्य व सात्त्विक लहरी आमच्याकडून ग्रहण केल्या जाऊ देत. त्यांतून मिळणार्‍या शक्‍तीतील चैतन्य सातत्याने टिकून राहू दे. मला मिळणार्‍या शक्‍तीचा वापर माझ्याकडून साधनेसाठी केला जाऊ दे.', हीच आपल्याचरणी प्रार्थना !
मानव हा एक निसर्गाचा भाग आदिम काळी मानवाचा विकास होऊ लागला. आणि आपल्या गरजा पुर्ण करणाऱ्या निसर्गाच्या अदभुत शक्तींना त्यांनी देव मानले. डोंगर, सूर्य, चंद्र, वारा, पाऊस या निसर्गातील घटकांचे त्याने पुजन सुरु केले कधी तो संतुष्ट व्हावा तर कधी तो कोपु नये म्हणून, सूर्य उदय व अस्त व पुन्हा पुन्हा हाच नेम, चंद्राच्या कला त्याने पहिल्या व उन्हाळा, पावसाला, हिवाळा हे पुन्हा पुन्हा येणारे ऋतू चक्र ही त्याने अनुभवले व या बदलांचे आधारे त्याने कालगणना करण्याचा प्रयत्न सुरु केला, विशिष्ट नैसर्गिक परस्थिती निर्माण होण्या अगोदरचे बदल त्याने समजून घेतले आणि त्याची चाहूल लागताच तो आनंद उत्सव ही साजरा करू लागला
हिवाळा संपतो आणि वसंताची चाहूल त्याला समजू लागली, वृक्ष आपली जुनी पाने गाळतात व नवीन धारण करू लागतात, पक्षी गुंजन करू लागतात, फुले बहरतात हा चक्रा प्रमाणे पुन्हा येणारा निसर्ग सोहळा त्याने अनुभवला, जीर्ण संपून जाते व नवीन जीवन जन्म घेते. जन्म व मृत्यू चे जीवन चक्र तो पाहताच होता, सृष्टी जीर्ण टाकते आणि नवीन धारण करते, हा ऋतूचा सोहळा त्याने सृष्टी चक्राची सुरवात मानली, या कालखंडातील पौर्णिमा, व अमावस्या नंतरचा दिवस त्याने या चक्राची सुरवात मानली,उत्तर भारतात पौर्णिमेनंतर तर दक्षिण भारतात अमावस्या नंतर ही सुरवात मानली गेली. व या नव जीवनाचे स्वागत तो उत्सवा मधून करू लागला यातूनच होळी, रंग पंचमी, गुडीपाडवा सारख्या सणाचा जन्म झाला, गुढी पुजन ही खरतर प्रतीकात्मक निसर्ग पुजा, वस्त्र लावून तयार केलेल्या काठ्या आपल्याला सर्वच लोक दैवतांचे जत्रेत भक्ती भावाने नाचविल्या जातात, या काठ्या मध्ये त्या देवताचे अस्तित्व मानले जाते, साडी व वस्त्र बांधुन त्यावर कलश लावून तयार केलेली गुढी धरणी मातेच रूपच. अगदी गणपती मध्ये येणाऱ्या गौराई ला देखील काही ठिकाणी कलशाचे मुखवटे करून त्यावर चेहरे काढले जातात. नवीन वस्त्र परिधान केलेली लिंब व आंब्याच्या मोहरानी व गाठी व फुलांचा हार यांनी सजलेली गुढी त्या काळातील धरतीच प्रतिक रूपच.
इसवी सनाचा आरंभ होत असताना महाराष्ट्रातील पैठण नगरीत राजधानी असलेल्या सातवाहन राजाचे साम्राज्य विस्तारात होते. आजच्या मराठीचे बालरूप हळू हळू वाढत होते. त्यावेळी महाराष्ट्री प्राकृत भाषा, (जी नंतर आधुनिक मराठी भाषेत रुपांतरीत झाली) सातवाहनांची राजभाषा होती. त्याचे साम्राज्याचे वर्णन त्याच्या घोड्यांनी तीन समुद्रांचे पाणी प्यायले होते. असे केले जात होते. ज्ञान, कला, साहित्य या सर्वात राज्याची प्रगती होती, स्थैर्य, सुबत्ता लाभलेल्या सातवाहन राज्यांनी नवऋतूच्या या लोकरुढीला कालगणनेची जोड दिली आणि ईस ७८ मध्ये शालिवाहन शकाचे रूपाने मराठी कालगणना सुरु झाली. व चैत्र पाडवा (गुढी पाडवा)मराठी कालगणनेचा नववर्ष प्रारंभ दिन झाला. सातवाहन राज्यांचे राज्यातील आजच्या गुजरात, कर्नाटक, आंध्रप्रदेश या राज्यात हीच कालगणना आजही प्रचलित आहे. कर्नाटक आंध्रप्रदेश मध्ये युगादी अथवा उगादी या नावाने हा दिवस साजरा केला जातो.
महाराष्ट्रात गुडी पाडवा उत्साहाने साजरा केला जातो. नवीन कार्य आरंभ करण्यासाठी हा शुभ मुहुर्त मानला जातो, चैत्र शुद्ध प्रतिपदेला सकाळी सूर्योदयाला आंब्याच्या डहाळ्यांचे व फुलांचे तोरण मुख्य दारावर लावले जाते, घराबाहेर अंगणात मोठी रांगोळी काढली जाते, दाराच्या उजव्या बाजूस छोटा लाकडी पाट गुढी उभारण्यासाठी मांडला जातो बांबूची काठी घेतली जाते. गुढी उभी करण्याच्या काठीला प्रथम गरम पाण्याने अंघोळ घालुन तिला हळद, चंदनाची सुवासिक द्रव्य लावतात. तिच्या टोकाला साडी वस्त्र व त्यावर एक कलश लिंबाचा व आंब्याचा मोहर असलेला पाला बांधला जातो. त्यावर फुलांची माळ व साखरेची गाठी बांधली जाते, व गुढी उभारून तिची पुजा केली जाते. गुढीला लिंबाचा कोवळा मोहर व गुळ यांचा नेवेद्य दाखविला जातो. गुढी सूर्योदयापासून सूर्यास्तापूर्वीपर्यंत घरावर डौलाने उभी केली जाते. घरात पुरणपोळी केली जाते. संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी गुढी खाली उतरावात. त्यापूर्वी हळदकुंकू लावून तिची पूजा करून तिला धने व गूळ यांचा नैवेद्य दाखविला जातो.
साखरेची गाठी मुलीच्या गळ्यात घालतात. या दिवशी मुलांनाही इळवणी घालण्याचा प्रघात काही ठिकाणी दिसतो . इळवणी म्हणजे उन्हात पाणी ठेवून त्या कोमट पाण्याने मुलांना अंघोळी घातल्या जातात
गुढीपाड्व्या विषयी काही धार्मिक कथा ही प्रचलित आहेत. ब्रह्मपुराणानुसार महाप्रलयानंतर ब्रह्मदेवांनी या दिवशी जगाची निर्मिती केली. या दिवसापासून पृथ्वीवरच्या खर्‍या जीवनचक्राला सुरुवात झाली, अशी आख्यायिका आहे. रामाने वनवासा नंतर अयोध्येत प्रवेश केला तो हा दिवस. अयोध्यावासीयांनी विजयोत्सवाच्या दिवसाचे प्रतीक म्हणून गुढी उभारून रामराज्याचे स्वागत केले. व तेव्हा पासुन ही प्रथा पडल्याचे ही सांगितले जाते.

हरी ॐ !